खासदार नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून हायकोर्टात आव्हान, याचिका दाखल

By बापू सोळुंके | Published: July 19, 2024 08:22 PM2024-07-19T20:22:38+5:302024-07-19T20:23:51+5:30

खंडपीठाने सुजय विखे यांची याचिका दाखल करून घेतली आहे.

The election of MP Nilesh Lanke has been challenged by Sujay Vikhe in the Aurangabad High Court, a petition has been filed | खासदार नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून हायकोर्टात आव्हान, याचिका दाखल

खासदार नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून हायकोर्टात आव्हान, याचिका दाखल

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

माजी खासदार सुजय विखे यांनी ॲड. आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच नीलेश लंकेंनी दाखविलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखविलेला नाही.

परिणामी, लंके यांनी दाखविलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे.

Web Title: The election of MP Nilesh Lanke has been challenged by Sujay Vikhe in the Aurangabad High Court, a petition has been filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.