छत्रपती संभाजीनगरवासीयांची ‘कालीमुछ’ला पहिली पसंती

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 17, 2023 07:50 PM2023-05-17T19:50:02+5:302023-05-17T19:50:45+5:30

वर्षभरात जेवढा तांदूळ शहरात विकतो, त्यातील निम्मा तांदूळ ‘कालीमुछ’ असतो.

The first choice of the people of Chhatrapati Sambhajinagar is 'Kalimuchh' | छत्रपती संभाजीनगरवासीयांची ‘कालीमुछ’ला पहिली पसंती

छत्रपती संभाजीनगरवासीयांची ‘कालीमुछ’ला पहिली पसंती

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांची ‘कालीमुछ’ला पहिली पसंती, असा मथळा वाचल्यावर तुम्ही एकदम आर्श्चयचकीत झाला असाल, पण गैरसमज नको, कालीमुछ म्हणजे पीळदार मिश्या नव्हे, तर ‘तांदळा’तील एक ‘वाण’ आहे. या तांदळाचा भात येथील खवय्यांना एवढा आवडतो की, वर्षभरात जेवढा तांदूळ शहरात विकतो, त्यातील निम्मा तांदूळ ‘कालीमुछ’ असतो.

कालीमुछ का आवडतो?
छत्रपती संभाजीनगरकरांना ‘कालीमुछ’ तांदूळ का आवडतो, याचे उत्तर भात खाल्ल्यावरच मिळते. भात शिजल्यावर नरम होतो. मोकळा होतो व सुगंधीत असतो. नुसत्या सुगंधामुळे हा भात खाण्याची खूप इच्छा होते.

कोणत्या तांदळाला किती भाव
वाण ---------- किंमत (क्विंटल)

कालीमुछ - ५,१०० रु. ते ५,५०० रु.
कोलम - ५,१०० रु. ते ५,५०० रु.
आंबेमोहर - ३,७०० ते ७,५०० रु.
इंद्रायणी - ४,००० ते ४,६०० रु.
मदर इंडिया - ४,००० ते ४,४०० रु.
बासमती - ९,००० ते ११,००० रु.

कालीमुछसोबत बासमतीही
वार्षिक धान्य खरेदी करणारे कालीमुछ खरेदी करतातच, शिवाय त्यासोबत बासमती तांदूळही आवर्जून खरेदी करतात. कारण दैनंदिन भात खाण्यासाठी कालीमुछचा वापर करतात किंवा सणाच्या दिवशी किंवा मंगलकार्याच्या वेळीस बासमतीचा खास बेत केला जातो. हेच छत्रपती संभाजीनगरकरांचे वैशिष्ट्य आहे.
- जगदीश भंडारी, तांदळाचे व्यापारी.

तेजीनंतर मंदी
मागील वर्षी डिसेंबरमध्ये बासमती व अन्य तांदळांची जगभरात निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने, देशांतर्गत जानेवारी, २०२३ या महिन्यात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, नंतर तीन महिन्यांत ३०० रुपयांनी भाव कमी झाले.

हंगामात दररोज ५० टन विक्री
डिसेंबर ते एप्रिलच्या दरम्यान दररोज ५० टन तांदळाची विक्री होते. यात २० ते २५ टन तांदूळ ‘कालीमुछ’ असतो.
- संजय कांकरीया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.

Web Title: The first choice of the people of Chhatrapati Sambhajinagar is 'Kalimuchh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.