जायकवाडीत येणारा नाशिकच्या पाण्याचा ओघ घटला; चार दिवसात जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 08:15 PM2023-09-13T20:15:15+5:302023-09-13T20:16:50+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे.

The flow of Nashik water coming to Jayakwadi has stopped; 2 percent increase in water storage in four days | जायकवाडीत येणारा नाशिकच्या पाण्याचा ओघ घटला; चार दिवसात जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

जायकवाडीत येणारा नाशिकच्या पाण्याचा ओघ घटला; चार दिवसात जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

googlenewsNext

पैठण:नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गेल्या चार दिवसात जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान गोदावरीतून धरणात दाखल होणाऱ्या पाण्याचा ओघ जवळपास बंद झाला असून बुधवारी केवळ ७२० क्युसेक्स क्षमतेने पाणी गोदावरीतून धरणात दाखल होत होते. 

नाशिकचेपाणी दाखल झाल्याने जायकवाडीचा जलसाठा ३४.५२%  इतका झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग सोमवारी मध्यरात्री बंद करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला असून नाममात्र दराने जायकवाडीत पाणी दाखल होत आहे. बुधवारी गोदावरीतून  फक्त ७२० क्युसेक्स क्षमते पाणी जायकवाडी कडेयेत असल्याची नोंद नागमठान येथील सरिता मापण केंद्रावर झाली आहे.

८ सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तेथील धरण समुहातील गंगापूर, कडवा, करंजवन, पालखेड, दारणा आदी धरणातून विसर्ग करण्यात आल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी पात्रात २५ हजार क्युसेक्स पेक्षा जास्त विसर्ग करण्यात आला होता. यामुळे गोदावरीस यंदाचा पहिला पूर आला, हे पाणी १० सप्टेंबरला मध्यरात्री जायकवाडी धरणात दाखल झाले. गेल्या चार दिवसात या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात दोन टक्क्यानी वाढ झाली. परंतु तेथील धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने धरणात येणारे पाणीही बंद झाले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे. बुधवारी धरणाची पाणीपातळी १५०७.२५ फूट झाली असून धरणात १४८७.५८१ दलघमी एकूण जलसाठा झाला आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप संरक्षण पाळी अंतर्गत धरणाच्या डावा कालवा ५०० व उजवा कालवा ९०० क्युसेक्स क्षमतेने सोडण्यात आला आहे. बुधवारी धरणात १८५३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती.

Web Title: The flow of Nashik water coming to Jayakwadi has stopped; 2 percent increase in water storage in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.