नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले: आठ तोळे सोन्यासह रोख १ लाख रुपये लंपास

By राम शिनगारे | Published: May 12, 2023 09:42 PM2023-05-12T21:42:08+5:302023-05-12T21:42:14+5:30

एन ४, सिडको भागातील घटना.

The house of a businessman who went to a relative's wedding was broken into | नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले: आठ तोळे सोन्यासह रोख १ लाख रुपये लंपास

नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले: आठ तोळे सोन्यासह रोख १ लाख रुपये लंपास

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ११ मे रोजी पहाटे उघडकीस आली. यात आठ तोळे सोने, एक लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचा ऐवज चोरट्यांनी लंनास केला. ही घटना गुरुसहानीनगर, एन ४, सिडको भागात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

उद्योजक दिलीप आबासाहेब पठाडे (रा. अबोली अपार्टमेंट, डी-२, तिरुपती पार्क, गुरुसहानी नगर, एन-४, सिडको) हे योगेश कदम यांच्या घरात किरायाने राहतात. त्यांची शेंद्रा एमआयडीसीत फिल्ड ग्रीप कंपनी आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नीच्या मामाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांची पत्नी मुलांसह दोन दिवस आधीच गेली होती. १० मे रोजी दुपारी १२ वाजता घराला कुलूप लाऊन दिलीप पठाडे हे लग्नासाठी ढवळापुरी येथे गेले. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते पत्नी, मुलांसह ११ मे रोजी पहाटे ४ वाजता घरी पोहचले. त्यांनी गेटचे कुलूप उघडून घराचे कुलूप उघडण्यासाठी गेले असता दरवाजा उघड दिसला. ते दरवाजा ढकलून आत गेले असता कपाटातील वस्तू अस्थाव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.

हा ऐवज गेला चोरीला
दिलीप पठाडे यांच्या घरातून चोरांनी १३ ग्रॅमचे गंठण, २२ ग्रॅमचे शॉर्ट गंठण, ६.४० ग्रॅमची कर्णफुले, ४.५० गॅमचा कानातील सुईदोरा, ३ तीन ग्रॅमचे टॉप्स, २० ग्रॅमची मुलांची साेनसाखळी, ६ ग्रॅमच्या बाळी, २ ग्रॅमचे ओम, १ ग्रॅमचा कॉईन, ५० हजार रुपये रोकड, २० हजार रुपयांचे चांदीचे जोडवे, ब्रासलेट, चेन आदी दागिने आणि दहा वर्षांपासून जमा केलेला गल्ला, अंदाजे ५० हजार रुपये, असा सहा लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि. शेषराव खटाने करीत आहेत.

Web Title: The house of a businessman who went to a relative's wedding was broken into

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.