पतीला रुग्णालयात नेले अन् इकडे चोरट्यांनी घर साफ केले; ६ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 06:14 PM2022-03-01T18:14:26+5:302022-03-01T18:15:11+5:30

३ लाख रोख व ३ लाख २८ हजारांचे दागीने लंपास 

The husband was taken to the hospital and here the burglars cleaned the house; Lampas worth Rs 6 lakh | पतीला रुग्णालयात नेले अन् इकडे चोरट्यांनी घर साफ केले; ६ लाखांचा ऐवज लंपास

पतीला रुग्णालयात नेले अन् इकडे चोरट्यांनी घर साफ केले; ६ लाखांचा ऐवज लंपास

googlenewsNext

सिल्लोड: शहरातील बालाजी नगर परिसरात राहणाऱ्या महिलेच्या पतीच्या छातीत अचानक चमक निघाली त्यांनी लगेच पतीला सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, इकडे घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात घुसत ३ लाखाची रोकड आणि ३ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने असा ६ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. 

जयश्री नंदकिशोर संचेती ( रा. बालाजी नगर) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. त्यांचे पती नंदकिशोर संचेती यांची अचानक प्रकुर्ती खराब झाल्याने त्यांना २३ फेब्रुवारी रोजी सिल्लोड व नंतर औरंगाबाद व अहेमदनगर येथे रुग्णालयात दाखल केले. ते व त्यांचा मुलगा रुग्णालयात असताना २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडत त्यातील ३ लाख रोकड आणि ३ लाख २८ हजारांची दागिने लंपास केली. 

संचेती सोमवारी रुग्णालयातून परत आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून  सोमवारी रात्री (२८ फेब्रुवारी ) रोजी तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे, फौजदार वाघुले यांनी घटनेचा पंचनामाकरून सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी डॉग स्कॉट व फिंगर एक्स्पपर्ड पथक यांना पाचारण केले होते मात्र त्यातून काही महत्वाचे हाती आले नाही.या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे करत आहे.

Web Title: The husband was taken to the hospital and here the burglars cleaned the house; Lampas worth Rs 6 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.