हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला

By राम शिनगारे | Published: March 21, 2023 06:25 PM2023-03-21T18:25:36+5:302023-03-21T18:26:35+5:30

दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये आपली दुचाकी उभी करून केली शिवीगाळ

The limit is reached! Traffic branch police broke the walkie-talkie, insulting the youth | हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला

हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नलजवळ कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना एका दुचाकीस्वार युवकाने अश्लिल व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ही घटना २० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हायकोर्ट सिग्नलजवळ घडली. या प्रकरणी युवकाच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संदेश सुरेश बत्तीसे (रा. उस्मानपुरा) असेक शिविगाळ करणाऱ्या युवकाचे नाव आहे. वाहतूक शाखा सिडको विभागाचे पोलिस अंमलदार समाधान लावणे व पचलोरे हे दोघे जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नलजवळ कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुचाकीवर (एमएच २० एफएम ४९९७) आलेल्या संदेश बत्तीसे याने दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये आपली दुचाकी उभी करून कोणतेही कारण नसताना पोलिस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच आरडा-ओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी समाधान लावणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत.

Web Title: The limit is reached! Traffic branch police broke the walkie-talkie, insulting the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.