मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली; पुण्याच्या पथकाने दहा ठिकाणचे लिकेज केले बंद

By मुजीब देवणीकर | Published: October 1, 2022 07:10 PM2022-10-01T19:10:05+5:302022-10-01T19:10:58+5:30

या पाईपलाईनमधील लिकेजेस काढून गळती बंद करण्यासाठी पूणे येथून महाराष्ट्र वॉटर अंडर सव्र्हिसेसच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले.

The main water line of Aurangabad city burst again; The Pune team stopped the leakages at ten places | मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली; पुण्याच्या पथकाने दहा ठिकाणचे लिकेज केले बंद

मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली; पुण्याच्या पथकाने दहा ठिकाणचे लिकेज केले बंद

googlenewsNext

औरंगाबाद: रेल्वेस्टेशन येथून आलेल्या ७०० मिलिमिटर व्यासाच्या पाईपलाईनला वेदांत चौकासमोरच्या भागात गळती लागल्याने तळघरात पाणी साचत असल्याची तक्रार या भागातील घरमालकांनी मनपा प्रशासकांकडे केली होती. 

या तक्रारीची दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाने गळती बंद करण्यासाठी पाणी वितरणाच्या पाईपलाईनची तपासणी केली असता या पाईपलाईनला लिकेजेस नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सिमेट रस्त्याखालून गेलेल्या सातशे मिलिमिटर व्यासाच्या पाईपलाईनला गळती असल्याचे स्पष्ट झाले. या पाईपलाईनमधील लिकेजेस काढून गळती बंद करण्यासाठी पूणे येथून महाराष्ट्र वॉटर अंडर सव्र्हिसेसच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. शुक्रवारी दिवसभर पाईपलाईन बंद ठेवून पाणबुंड्यांनी क्रॉस कनेक्शन असलेल्या सातशेच्या पाईपलाईनमधील १० गळत्या केमीकलच्या साह्याने बंद केल्या.

रेल्वेस्टेशन रोड ते वेदांत चौक दरम्यान सिमेंट रस्त्याखाली असलेल्या सातशे मिलिमिटर व्यासाच्या पाईपलाईनला लिकेजेसमुळे गळती लागली होती. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने ही गळती शोधून पाणबुड्यांच्या मदतीने दहा ठिकाणी असलेल्या गळत्या बंद केल्या. तसेच २५ जॉैर्इंट देखील केमीकलच्या साह्याने मजबूत करण्यात आले.

Web Title: The main water line of Aurangabad city burst again; The Pune team stopped the leakages at ten places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.