छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला

By सुमित डोळे | Published: August 19, 2023 12:35 PM2023-08-19T12:35:31+5:302023-08-19T12:36:03+5:30

उपनिरीक्षकांच्या कालावधी संपण्याआधीच बदल्या झाल्याने काहींनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. ९ निरीक्षक, ९ एपीआयची, २५ पीएसआयची बदली

The much awaited transfers in the Chhatrapati Sambhajinagar City Police Force have finally been announced | छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा पोळा शुक्रवारी सायंकाळी फुटला. नऊ पोलिस निरीक्षकांसह नऊ सहायक निरीक्षक व २५ उपनिरीक्षकांचा त्यात समावेश आहे. मात्र, काही निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या कालावधी संपण्याआधीच बदल्या झाल्याने काहींनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. बदली झालेल्यांना शनिवारीच नवीन ठिकाणी रूजू होण्याचे आदेश आहेत.

पोलिस निरीक्षक कुठून कोठे? (पाेलिस ठाणे)
१. गीता बागवडे -वाळूज -           सिडको
२. दिलीप गांगुर्डे -वाळूज वाहतूक- वाळूज पो. ठा.
३. संभाजी पवार -सिडको -आर्थिक गुन्हे शाखा
४. प्रशांत पोतदार -सातारा- हर्सूल
५. अमोल देवकर - हर्सूल - वाहतूक शाखा १
६. अशोक गिरी - नियंत्रण कक्ष - सातारा
७. सचिन इंगोले - छावणी वाहतूक - वाळूज वाहतूक
८. राजेश यादव - कोर्ट मॉनिटरिंग - हायकोर्ट सुरक्षा
९. हनुमंत गिरमे - हायकोर्ट सुरक्षा - कोर्ट मॉनिटरिंग

नऊ सहायक निरीक्षकांचा समावेश
पांडुरंग भागिले यांची उस्मानपुरा, गौतम वावळे सिडको, अनिल कंकाळ मुकुंदवाडी, मनोज शिंदे सिडको, शिवाजी चौरे सिटी चौक, सुनील कराळे सायबर, सुरेश थोरात व सचिन सदाफुले यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.

कालावधी आधीच बदली; चर्चांना उधाण
निरीक्षक गीता बागवडे यांची नुकतीच वाळूज ठाण्यात बदली झाली होती. मात्र, काही महिन्यांतच त्यांची तेथून सिडको पोलिस ठाण्यात बदली झाली तर गांगुर्डे यांची गेल्या नऊ महिन्यांत तब्बल चौथ्यांदा बदली झाली. पुंडलिकनगरवरून वाळूज वाहतूक मिळाल्यानंतर त्यांची बेगमपुऱ्यात व पुन्हा वाळूज वाहतूक शाखा अशी बदली झाली. आता पुन्हा काही महिन्यांतच त्यांना वाळूज पोलिस ठाण्याचा पदभार मिळाला आहे.

Web Title: The much awaited transfers in the Chhatrapati Sambhajinagar City Police Force have finally been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.