छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी सुरू असलेले उपोषणही स्थगित

By बापू सोळुंके | Published: November 3, 2023 12:39 PM2023-11-03T12:39:20+5:302023-11-03T12:41:27+5:30

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांचा निर्णय

The ongoing hunger strike at various places in Chhatrapati Sambhajinagar has also been suspended | छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी सुरू असलेले उपोषणही स्थगित

छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी सुरू असलेले उपोषणही स्थगित

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण गुरुवारी रात्री स्थगित केले. याला पाठिंबा देत शहरातील विविध ठिकाणच्या उपोषणकर्त्यांनीही त्यांचे उपोषणही स्थगित केले.

भानुदासनगर
जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे बबनराव डिडोरे पाटील यांच्या उपस्थितीत विशाल डिडोरे, अक्षय मात्रे, संदीप शिंदे, भरत जाधव यांनी साखळी उपोषण मागे घेतले. यावेळी शंकर मात्रे, अनिल विधाते, संदीप शिंदे, कपिल नागोडे, नंदू लबडे, भरत पाटील, विशाल राऊत, देवीदास खरात, अभय भोसले, विजय पाटील, शेख हाफीज, राहुल कोलते, दिलीप विधाते, साईनाथ ताठे, नितीन चव्हाण आदींची उपस्थिती होती.

संघर्षनगर
मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथे मयूर महाकाळ यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक यांच्या हस्ते त्यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले. येथील आंदोलकांनी मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. यात उज्ज्वला दाणे, संगीता मुठ्ठे, अर्चना महाकाळ, कमल तवार आदी सहभागी आहेत.

शिवशंकर कॉलनी
शिवशंकर कॉलनी सायली चौक येथे सुरू असलेले उपोषण स्थगित केले. जवाहर नगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. अनसूया शिंदे, संजय शिंदे, गोरख सोनवणे, अनिल थोटे, राजू पाटील, अरुण पवार, सोमनाथ देवरे, जगन्नाथ कोराळे, विष्णू शेवलीकर, अरुण काळे आदींनी उपोषण स्थगित केेले.

सारा वैभव सोसायटी
जटवाडा रोडवरील सारा वैभव सोसायटीत सुरू असलेले साखळी उपोषण गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता स्थगित करण्यात आले. यावेळी अशोक हिवराळे, बाबासाहेब जंगले, कैलास सुपेकर, सुभाष काकडे, किसन बिरादार आदींची उपस्थिती होती.

हनुमाननगर
हनुमाननगर येथील उपोषणकर्ते कांता पाटील यांचे उपोषण जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यानंतर उपोषणकर्त्यांना औषधोपचारासाठी मिनी घाटीत दाखल करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

प्रथमेशनगरीत कॅण्डल मार्च
देवळाई, परिसरातील प्रथमेशनगरी हौउसिंग सोसायटीतील रहिवाशांनी प्रथमेशनगरी-देवळाई चौक- छत्रपतीनगर-अलोकनगर मार्गे देवळाई रोड असा कॅण्डल मार्च करण्यात आला होता. या रॅलीत रमेश रोडगे, सत्यविजय देशमुख, देविदास भुजंग, रवींद्र देशमुख, दिव्या पाटील, संगीता भुजंग, हेमा पाटील, वैशाली मुळीक, लता बावणे, विजया पवार, रेणुका सोमवंशी, योगिता पाटील, शुभ्रा कदम आदींसह सुमारे १५० ते २०० महिला, पुरुष, तरुण, तरुणी सहभागी झाले होते.

Web Title: The ongoing hunger strike at various places in Chhatrapati Sambhajinagar has also been suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.