दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात मंद; पेरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:25 PM2022-06-20T12:25:51+5:302022-06-20T12:26:38+5:30

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस औरंगाबाद, जालना आणि हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत नोंदविला गेला आहे.

The onset of monsoon in Marathwada is slower than in two years; Still waiting for heavy rain | दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात मंद; पेरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा

दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात मंद; पेरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सूनची सुरुवात मंदपणे झाली आहे. मान्सूनला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. २०२० साली जून महिन्यातील २० तारखेपर्यंत १३९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. २०२१ सालच्या जून महिन्यातील २० तारखेपर्यंत ५९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत ६० टक्के कमी पाऊस झाला आहे, तर नियमित पर्जन्यमानाच्या तुलनेत २५ टक्के कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे. पेरण्यांचा वेग वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.

वर्ष २०२० आणि २०२१ साली कोरोनाच्या दोन लाटांमुळे लॉकडाऊन होते. प्रदूषणाचे प्रमाण त्यामुळे घटले. दैनंदिनीला ब्रेक लागल्यामुळे हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्याचा परिणाम पर्जन्यमान उंचावण्यावर झाल्याचे बोलले गेले. यंदा मात्र पावसाला विलंब झाला आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस औरंगाबाद, जालना आणि हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत नोंदविला गेला आहे. गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची दमदार सुरुवात झाली होती.

२०२१ साली औरंगाबाद जिल्ह्यात आजवर ९३.७ मि.मी., जालना १२८ मि.मी., बीड १४१ मि.मी., लातूर १४९ मि.मी., उस्मानाबाद ९७.२ मि.मी., नांदेड १६९ मि.मी., परभणी १९९ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात १७९.५ मि.मी पाऊस झाला होता, तर २०२० साली औरंगाबादमध्ये १७९ मि.मी., जालना १६१, बीड १४४, लातूर १२६, उस्मानाबाद १०२, नांदेड १०९, परभणी १४४, तर हिंगोलीत १५७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

यंदा विभागात जिल्हानिहाय झालेला पाऊस
औरंगाबाद-----५३.९ मि.मी.
जालना-----४९.८ मि.मी.
बीड-----६२.४ मि.मी.
लातूर-----६०.८ मि.मी.
उस्मानाबाद----४९.९ मि.मी.
नांदेड-----६७.६ मि.मी.
परभणी-----६४.३ मि.मी.
हिंगोली----५६.५ मि.मी.
एकूण-----५९.२ मि.मी.

Web Title: The onset of monsoon in Marathwada is slower than in two years; Still waiting for heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.