वृद्ध मातापित्यास घराबाहेर काढणाऱ्याने उचलला पोलिसावर हात, हर्सुल परिसरातील घटना
By राम शिनगारे | Published: October 8, 2023 09:28 PM2023-10-08T21:28:14+5:302023-10-08T21:28:21+5:30
आरोपी मुलाच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : हर्सुल पोलिसांनी एका ६५ वर्षांच्या वृद्ध मातापित्यास मारहाण करीत घरातुन बाहेर काढले. तेव्हा त्यांनी ११२ नंबरवर पोलिसांची मदत मागितली. वृद्धांच्या मदतीसाठी तात्काळ पोहचलेल्या पोलिसांनाही आरोपी मुलाने मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री हर्सुल परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून एकाच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संदीप भिमराव औताडे (रा.गल्ली नंबर ५, पिसादेवी) असे आई वडिलांसह पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिस नाईक अंबरसिंग राजपुत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी ९ वाजेपासून ते हर्सुल ठाण्यातील डायल ११२ वर बिट मार्शल होते. रात्री सव्वानऊ वाजता त्यांना गल्ली नंबर ५, पिसादेवी येथून ११२ वर मदतीसाठी कॉला आला. त्यानुसार सहकाऱ्यांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तेव्हा भिमराव औताडे (६५) यांच्यासह पत्नीला त्यांचा मुलगा संदीप याने मारहाण करीत घराबाहेर काढले होते. तेव्हा पोलिस संदीप यास समजावून सांगत होते. तेव्हा त्याने पोलिसांच्या अंगावर धावुन जात ११२ ची मशीन, वॉकिटाकी हिसकावून घेत खाली फेकून दिली. त्यामुळे दोन्ही यंत्र तुटले. तसेच फिर्यादी पोलिस कर्मचाऱ्यांच्या गच्चीला पकडून ढकलून दिले. त्यात त्यांचे शर्टची बटने तुटली. तुम्ही पोलिसवाले निघुन जा , नाहीतर तुम्ही नोकरी कशी करता, तुमच्या नोकऱ्या घालवत असे म्हणत धमकी दिली. तेव्हा पोलिसांनी अतिरिक्त मदत मागितली. त्यानुसार पोलिस ठाण्याची टु मोबाईल तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्यास पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याचे तक्रारी म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास हर्सुल पोलिस करीत आहेत.