अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला खिसा रिकामा
By संतोष हिरेमठ | Published: August 30, 2022 03:55 PM2022-08-30T15:55:38+5:302022-08-30T16:04:38+5:30
यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाद मागण्यात आली आहे.
औरंगाबाद : अग्नीवीर सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची औरंगाबादरेल्वेस्टेशनवररेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दंडाच्या नावाखाली लूट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाद मागण्यात आली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वेने चौकशी सुरु केल्याचेही समजते.
हा सगळा प्रकार अजय धनजे नावाच्या तरुणाने ट्विटरवर नमूद केला आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून चुकीचे तिकट असल्याचे कारण पुढे करून रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे उकळल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र के औरंगाबाद में अग्निवीर भर्ती के लिए आए युवकों से गलत टिकट से रेल से सफर के गलती को जुर्म बताकर पैसे एट रहें हैं। अगर पैसे नहीं देंगे तो केस करेंगे और कभी सरकारी नौकरी के लायक नहीं रहोगे ऐसी धमकी इस वीडियो में ‘मराठी’ भाषा में दी गई हैं।@raosahebdanve@IRCTCofficial
— Ajay (@AjayDhanje) August 27, 2022
काय आहे ट्विटमध्ये:
ट्विटमध्ये एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. परंतु त्यात केवळ आवाज येतो आणि कोणेही चित्र दिसत नाही. यात एक महिला तरुणाकडे पैसे मागत आहे. तसेच पैसे नाहीत असे म्हटल्यास गुन्हा दाखल केल्यास तिथे पैसे निघतात असेही महिला म्हणत आहे.