विद्यापीठाच्या १९ अभ्यास मंडळांचे अध्यक्ष ठरले, फक्त ५ मंडळांचीच निवडणूक होणार
By संतोष हिरेमठ | Published: April 20, 2023 01:00 PM2023-04-20T13:00:57+5:302023-04-20T13:02:09+5:30
२५ एप्रिल रोजी होणार मतदान, १४ अध्यक्षपदे रिक्तच
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ निवडणुकीत अध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज राहिल्याने निवडणूक अटळ आहे. या मंडळात प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात असून येत्या २५ एप्रिल रोजीच्या बैठकीत मतदान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
पाच अभ्यास मंडळांमध्ये मराठी, हिंदी, इतिहास, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र या मंडळांचा समावेश आहे. या पाच मंडळांसाठी एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. येत्या २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे. चार विद्याशाखांतील ३८ अभ्यास मंडळांची निवडणूक प्रक्रिया कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत डॉ. संजय राठोड, डॉ. बालाजी नवले, डॉ. राहुल हजारे, डॉ. सुनील नरवडे, डॉ. विश्वास साखरे, डॉ. एजाज कुरेशी, डॉ. कीर्तिवंत गडले व डॉ. संदीप गायकवाड या आठ जणांनी माघार घेतली.
प्रत्येकी एकच उमेदवार; निवडीवर शिक्कामोर्तब
विविध विद्या शाखांतील १९ अभ्यास मंडळांसाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने बैठकीच्या दिवशी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
विद्या शाखानिहाय अभ्यास मंडळ व नियोजित अध्यक्ष
मानव्य विद्या शाखा (८) :
लोकप्रशासन - डॉ. सतीश दांडगे, राज्यशास्त्र - डॉ. शुजा शाकीर, मानसशास्त्र - डॉ. अपर्णा अष्टपुत्रे, इंग्रजी - डॉ. रमेश चौगुले, समाजशास्त्र -डॉ. लक्ष्मण साळोख, अर्थशास्त्र - दिलीप अर्जुने, भूगोल - डॉ. अकबर खान, प्रोसिजरल लॉ - डॉ. अपर्णा कोतापल्ले.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा (४) :
प्राणिशास्त्र - डॉ. सुनीता बोर्डे, गणित - डॉ. जगदीश नारनवरे, सूक्ष्म जीवशास्त्र - डॉ. बी. एन. डोळे, पदार्थ विज्ञान - डॉ. प्रशांत दीक्षित.
वाणिज्यशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र (३) :
बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन - डॉ. गणेश काथार, अकाऊंट्स - डॉ. हरिदास विधाते, एमबीए - डॉ. प्रसाद मदन.
आंतरविद्या शाखा (४) :
शारीरिक शिक्षण संचालक - डॉ. कल्पना झरीकर, शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ. सुहास पाठक, शैक्षणिक तत्त्वज्ञान - डॉ. महेश्वर कळलावे, गृहविज्ञान - डॉ. माया खंदाट.
ही अध्यक्षपदे रिक्त
अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी मंडळासाठी एकही उमेदवार पात्र, वैध ठरला नाही. त्यामुळे १४ अध्यक्षांच्या जागा रिक्त राहणार आहेत. यात उर्दू, सबस्टेंटिव्ह लॉ, एमसीए, फिशरीज, बिझिनेस इकोनॉमिक्स, एमसीए, बीपीएड महाविद्यालय, शारीरिक शिक्षण अध्यापक, शैक्षणिक प्रशासन तसेच अभियांत्रिकी शाखेतील पाचही अभ्यास मंडळांचे अध्यक्षपद रिक्त राहिले आहे.