महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार ‘आधे इधर, आधे उधर’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:29 PM2022-06-17T16:29:19+5:302022-06-17T16:32:30+5:30

शिवसेनेचे दोन आमदार, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीच आहेत.

The ruling MLAs on the performance of the grand alliance government 'half here, half there'! | महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार ‘आधे इधर, आधे उधर’ !

महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार ‘आधे इधर, आधे उधर’ !

googlenewsNext

- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद :
जिल्ह्यात अपक्ष आमदार एकही नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर ते समाधानी असण्याचा वा नसण्याचा प्रश्नच नाही. महाआघाडीमधले शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील दोन आमदार आहेत. कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. शिवाय विधान परिषदेवरही कॉंग्रेसचा कुणी आमदार नाही. भाजपचे तीन आमदार विरोधी पक्षात असल्याने ते महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

शिवसेनेचे दोन आमदार, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीच आहेत. पैठणचे संदीपान भुमरे हे रोहयो व फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, तर सिल्लोडचे अब्दुल सत्तार हे महसूल व ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांसह सहा खात्याचे मंत्री आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचीच चलती आहे. 
१) जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार? कॉंग्रेस : एकही नाही
राष्ट्रवादी : निवडून आलेला एकही नाही, शिक्षक व पदवीधर आमदार राष्ट्रवादीचे आहेत.
शिवसेना : निवडून आलेले पाच आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेला एक आमदार
भाजप : तीन आमदार
अपक्ष : एकही नाही 

२) सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?

कॉंग्रेसचा एकही आमदार नाही.
राष्ट्रवादी :

सरकारच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. सरकार स्थापन होऊन काहीच दिवस झाले होते आणि कोरोनाची महामारी सुरू झाली. त्यामुळे सरकारला जनतेचे प्राण वाचवायला प्राधान्य द्यावे लागले. त्यामुळे इतर खात्यांचाही निधी तिकडे वळवावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने सरकार ज्या ज्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल, ते तसे दिले जाईल. सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहोत.
- विक्रम काळे, शिक्षक आमदार, मराठवाडा विभाग

शिवसेना
थोड्याफार कुरबुरी असल्या तरी महाविकास आघाडी सरकारकडून आम्ही निधी मिळवायचा प्रयत्न करतो. नव्या आमदारांना निधी मिळताना अडचणी येतात. परंतु आम्ही निधी मिळवायचा प्रयत्न करतो. सध्या माझ्या औरंगाबाद प. मतदारसंघात सातशे ते आठशे कोटींची कामे सुरू आहेत. हे सरकार आल्यापासूनची ही कामे असून, त्यामुळे सरकारच्या कामगिरीवर नाराज असण्याचे कारण नाही.
- संजय शिरसाट, आमदार, औरंगाबाद प. मतदारसंघ

Web Title: The ruling MLAs on the performance of the grand alliance government 'half here, half there'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.