घाटी रुग्णालयात दवा नव्हे दारूच्या बाटल्यांचा खच; अभ्यागत समितीच्या पाहणीत आले उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:14 PM2022-03-23T16:14:09+5:302022-03-23T16:15:16+5:30
यापूर्वी घाटी रुग्णालय परिसरात देशी दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आले.
औरंगाबाद: रुग्णांना जीवनदान देणाऱ्या घाटी रुग्णालय परिसरात औषधां ऐवजी दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी अभ्यागत समितीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला.
नव्याने गठीत झालेल्या अभ्यागत समितीच्या सदस्यांनी आज सकाळी घाटी रुग्णालयातील सोयीसुविधांसाठी पाहणी दौरा केला. सुरुवातीला सदस्यांनी रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. तसेच आणखी कोणत्या सुविधां वाढविण्याची गरज आहे याची माहिती घेतली. दरम्यान, सदस्यांनी घाटी रुग्णालय परिसरातील एका वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी वसतिगृहात दारूंच्या बाटल्यांचा खच आढळून आला. या प्रकारामुळे अभ्यागत समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी घाटी रुग्णालय परिसरात देशी दारूची विक्री होत असल्याचे 'लोकमत'ने उघडकीस आणले होते. यावर पोलिसांनी कारवाई केल्याने या प्रकाराला आळा बसला. मात्र,आता वसतिगृहातचा दारूंच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने दवाखान्याचे मद्यालयात रुपांतर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.