उन्हाळ्याच्या झळा वाढल्या; श्वानाला लागलं सलाईन !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:37 PM2022-04-07T18:37:39+5:302022-04-07T18:40:57+5:30

शेंद्रा बन परिसरातील अनेक श्वानांना अतिसाराच्या समस्येला सामोरे जावे लागत असून काही मोकाट श्वानांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

The summer increased; The dog got saline! | उन्हाळ्याच्या झळा वाढल्या; श्वानाला लागलं सलाईन !

उन्हाळ्याच्या झळा वाढल्या; श्वानाला लागलं सलाईन !

googlenewsNext

- कृष्णा नेमाने
शेंद्रा ( औरंगाबाद) : सध्या पाळीव तसेच जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका बसत आहे. तीव्र उन्हाचे चटके बसू लागताच प्रत्येक जण पाणी अथवा गारवा शोधतो. माणसाला ही गरज पूर्ण करणे सहज साध्य होते; मात्र प्राणी व पक्ष्यांना नैसर्गिक स्रोतांमधूनच आपली गरज भागवावी लागत असल्याने उन्हाळा नकळत अनेक पशु-पक्ष्यांच्या जिवावर बेततो आहे. पाळीव कुत्रेही याला अपवाद राहिले नसून उष्माघाताचे कुत्रेही शिकार होत आहेत.

शेंद्रा बन परिसरातील अनेक श्वानांना अतिसाराच्या समस्येला सामोरे जावे लागत असून काही मोकाट श्वानांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाळीव श्वान एकाएकी मान खाली टाकत असल्याने श्वानमालक चिंतित आहेत.

आजाराची कारणे...
- अचानक वातावरणीय बदल
- अति तापमानात श्वानांचा वापर
- नियमित लस न देणे
- दूषित पाणी पिणे
- श्वानांच्या अंगावर पाणी टाकणे

उपाय ....
- श्वानाला थंड जागी ठेवणे
- इतर श्वानांचा संपर्क न होऊ देणे
- श्वानांच्या लसी नियमित देणे
- स्वच्छ पाणी पाजणे
- श्वानांची जागा स्वच्छ आणि स्वतंत्र ठेवणे

घ्यावी काळजी....
श्वानांना लवकर सकाळी आणि संध्याकाळी जेवण तसेच स्वच्छ सावली, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि उन्हात श्वान येणार नाही, ही काळजी श्वान पालकांनी घ्यावी.
- शीला जाधव, पशुधन अधिकारी, करमाड

आरोग्य बिघडत आहे...
पाळीव श्वानांना अति तापमानाला सामोरे जावे लागत असल्याने श्वानांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, श्वानपालकांनी श्वानाला स्वच्छ जागा, स्वच्छ पाणी, उन्हापासून बचाव होईल, अशी व्यवस्था करावी.
- अनिल ढवळे, श्वानप्रेमी

Web Title: The summer increased; The dog got saline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.