सूर्य कोपला! छत्रपती संभाजीनगरचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 19:12 IST2025-04-08T19:11:44+5:302025-04-08T19:12:07+5:30

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पुढील दाेन दिवस उष्णतेची लाट असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

The sun is shining! The mercury in Chhatrapati Sambhajinagar exceeds 41 degrees for the second consecutive day | सूर्य कोपला! छत्रपती संभाजीनगरचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांच्या पुढे

सूर्य कोपला! छत्रपती संभाजीनगरचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांच्या पुढे

छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांपासून शहर व परिसरावर सूर्य कोपला आहे. रविवारी शहर व परिसराचे कमाल तापमान ४०.२ अंशांवर पाेहोचले हाेते. सोमवारी ४१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर आज मंगळवारी पारा ४१.६ अंश सेल्सिअसवर पोहचला. आजचे किमान तापमान देखील २६.२ अंश सेल्सिअस असे नोंद झाले. शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांवर पोहचल्याने उष्णतेच्या असह्य झळाने नागरिकांचे हाल झाले.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पुढील दाेन दिवस उष्णतेची लाट असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये साेमवारी एका अंशाची वाढ हाेत तापमान ४१ अंशावर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा ५ अंशाने अधिक आहे. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने सोमवारी घेतली. दरम्यान, आज ४१. ६ अंशाची नोंद झाल्याने नवा विक्रम झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मागील चार वर्षांतील एप्रिलमधील तापमान
वर्ष.................सरासरी कमाल तापमान

२०२१.............३८ अंश सेल्सिअस
२०२२.............४१ अंश सेल्सिअस
२०२३.............३७ अंश सेल्सिअस
२०२४.............३८ अंश सेल्सिअस

एप्रिलमध्ये वाढलेले तापमान
तारीख- कमाल-किमान

५ एप्रिल - ३९.४ -२२.६
६ एप्रिल - ४०.२ -२३.३
७ एप्रिल- ४१.०- २४.१
८ एप्रिल- ४१.६- २६.२

Web Title: The sun is shining! The mercury in Chhatrapati Sambhajinagar exceeds 41 degrees for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.