यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 01:55 PM2024-09-09T13:55:41+5:302024-09-09T13:56:22+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या चार महिन्यांत ११२ कारवाया; ८९ वाहने आणि १ यंत्रही पथकाने जप्त केले 

The system has become weak, the sand mafia has been fined crores and recovered lakhs | यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची

यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाला वाळू माफिया, मुरूम, दगड, मातीची चोरटी वाहतूक करणारे डोईजड झाले आहेत. तहसीलच्या आवारातून वाहने पळवून नेऊनही प्रशासन हातावर हात धरून आहे, तर दुसरीकडे वाळूसह इतर गौणखनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या माफियांकडून दंड वसुलीत प्रशासन ढिसाळ कारवाई करीत असल्याचे दिसते. चार महिन्यांत ११२ कारवायांमध्ये १ कोटी ७९ लाख पैकी फक्त ८८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात २ आरोपींना अटक केली. ८९ वाहने आणि १ यंत्रही जप्त करण्यात आले. सर्वाधिक ३१ कारवाया या अपर तहसील कार्यालयाच्या आहेत. १३ गुन्हे ९ तालुक्यांमध्ये दाखल नोंदविले आहेत.

वरिष्ठ कारवाई करतील
अवैध उत्खनन प्रकरणात कारवाईची जबाबदारी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांची आहे. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक कारवाई होत नसेल, तर त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई करतील.
- किशोर घोडके, जिल्हा गौण खनिज अधिकारी

तालुका.......दंड.................................. वसूल.......
गंगापूर.......... ७ लाख ५० हजार ........... ७ लाख ५० हजार
वैजापूर.......... ७ लाख ८ हजार ...........२ लाख ७२ हजार
छत्रपतीसंभाजीनगर...... ३६ लाख..३६ हजार ......२८ लाख १८ हजार
अपर तहसील .....२४ लाख ८६ हजार..........१३ लाख १९ हजार
खुलताबाद......... ३ लाख ५२ हजार............... १ लाख ३७ हजार
कन्नड ..........२५ लाख०३ हजार................ ११ लाख ९ हजार
सिल्लोड.......... ६ लाख ४१ हजार............ १ लाख ३९ हजार............
फुलंब्री............ ९ लाख ७३ हजार.............. १ लाख ३० हजार
पैठण ............५९ लाख १० हजार............ २२ लाख १३ हजार
-------------------------------------------------------
एकूण १ कोटी ७९ लाख ५९ हजार .................८८ लाख ५९ हजार

Web Title: The system has become weak, the sand mafia has been fined crores and recovered lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.