किंचित दिलासा! पासपोर्टसाठी दोन महिन्यांची ‘वेटिंग’ आली दीड महिन्यावर

By साहेबराव हिवराळे | Published: October 6, 2023 05:50 PM2023-10-06T17:50:36+5:302023-10-06T17:51:25+5:30

अधिकचे टेबल वाढविण्याचा प्रस्ताव; प्रत्यक्षात हालचाली काहीच नाहीत

The two-month 'waiting' for the passport came to one and a half months | किंचित दिलासा! पासपोर्टसाठी दोन महिन्यांची ‘वेटिंग’ आली दीड महिन्यावर

किंचित दिलासा! पासपोर्टसाठी दोन महिन्यांची ‘वेटिंग’ आली दीड महिन्यावर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पासपोर्ट कार्यालयात ऑनलाइन अर्ज नोंदणीनुसार पूर्वी दोन महिन्यांची ‘वेटिंग’ होती; परंतु आता शनिवारीदेखील कामकाज सुरू असल्याने ती आता दीड महिन्यावर आली आहे. अधिकचे टेबल वाढविण्याचा प्रस्ताव होता; परंतु प्रत्यक्षात तशा काही हालचाली घडल्या नाहीत.

स्मार्ट शहरात अधिक ‘स्मार्ट’ काम व्हावे, यासाठी गती वाढविण्याची आवश्यकता आहे, असे पासपोर्ट लाभधारकांचे मत आहे. स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगरात उद्योग तसेच शैक्षणिक कारणासाठी देशविदेशात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असून, कोरोनानंतर परदेशात जाणाऱ्यांचीही गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे वर्षभर आधीच पासपोर्ट काढण्याच्या तयारीला लागावे लागते. मात्र, तत्काळ पासपोर्ट काढायचा असल्यास मुंबई किंवा नाशिक कार्यालयात जावे लागेल, असे सुचविले जाते. पूर्वीसारखी गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने येथे सेवा उपलब्ध करून दिली, त्यामुळे मोठ्या खर्चिक हेलपाट्यांतून शहरवासीयांना सूट मिळाली; परंतु नाईलाजास्तव प्रतीक्षा मात्र बरीच करावी लागत आहे.

प्रतीक्षा यादी कमी करण्याचा प्रयत्न
पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने गती वाढविण्यासाठी आणि प्रतीक्षा यादी कमी करण्याच्या हेतूने ऑनलाइनची यंत्रणा आणलेली असून, ती कार्यान्वित करणे तसेच टेबल व मनुष्यबळ वाढविण्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.
-अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

Web Title: The two-month 'waiting' for the passport came to one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.