विद्यार्थी कलावंतांनी विद्यापीठ फुलले; केंद्रीय युवक महोत्सवाचे जल्लोषात उदघाटन

By योगेश पायघन | Published: October 16, 2022 01:10 PM2022-10-16T13:10:41+5:302022-10-16T13:12:28+5:30

महोत्सवात ३६ कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी सात रंगमंचावर सादरीकरण होणार आहे.

The university blossomed with student artists; The grand opening of the Central Youth Festival | विद्यार्थी कलावंतांनी विद्यापीठ फुलले; केंद्रीय युवक महोत्सवाचे जल्लोषात उदघाटन

विद्यार्थी कलावंतांनी विद्यापीठ फुलले; केंद्रीय युवक महोत्सवाचे जल्लोषात उदघाटन

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवाचे अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्या हस्ते आज सकाळी उदघाटन झाले. कलाकारांनी फुललेल्या विद्यापीठात सकाळी नऊ वाजता शोभायात्रेने उत्सवाला वाय पाॅईंट येथून कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. 

महोत्सवात ३६ कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी सात रंगमंचावर सादरीकरण होणार आहे. कोरोनाचे परिणाम, शेतकरी समस्या, शिक्षण, बेरोजगारी, महागाई या विषयांकडे शोभयात्रेतून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. ज्ञानोबा माऊली तुकाराम...म्हणत ढोल ताशा, पारंपरिक वाद्याच्या गजरात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रा उदघाटन होत असलेल्या रंगमंचाकडे निघाली. २३५ संघ या युवक महोत्सवात सहभागी झले आहेत. शोभायात्रेत २४ संघांनी सहभाग नोंदवला.लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप, प्र कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ भगवान साखळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. संजय सांभाळकर,  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


असे आहेत दिवसभरातील कार्यक्रम : 

स्टेज क्र. १. सृजनरंग
सकाळी ११ वाजता - उद्घाटन समारंभ
दु. २ ते सायं. ६ वाजेपर्यंत समूह व सुगम गायन

नाट्यगृहाशेजारी स्टेज क्र.२. लोकरंग
दु. २ ते सायं. ५ वाजेपर्यंत - भजन
दु. ५ ते रात्री १० वाजेपर्यंत - पोवाडा

विद्यापीठ नाट्यगृह, स्टेज क्र. ३. नाट्यरंग
२ ते सायं. ४ वाजेपर्यंत - मूकअभिनय
दु. ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत - एकांकिका


मानसशास्त्र विभाग, स्टेज क्र. ४. नादरंग
२ ते सायं. ६.३० वाजेपर्यंत - शास्त्रीय तालवाद्य
सायं. ६.३० ते रात्री. १० वाजेपर्यंत - शास्त्रीय सूरवाद्य

शिक्षक भवन शेजारी स्टेज क्र. ५. नटरंग
२ ते दु. ४.३० वाजेपर्यंत - लोकगीत
दु. ४.३० ते रात्री १० वाजेपर्यंत - लोकनाट्य


संस्कृत विभाग स्टेज क्र. ६. शब्दरंग
दु. २ ते रात्री १० वाजेपर्यंत वक्तृत्व स्पर्धा


ललितकला विभाग, स्टेज क्र. ७. ललितरंग
दु. २ ते दु. ४ वाजेपर्यंत - चित्रकला
दु. ४ ते सायं. ७ वाजेपर्यंत - व्यंगचित्रकला
दु. ७ ते रात्री १० वाजेपर्यंत - पोस्टर

Web Title: The university blossomed with student artists; The grand opening of the Central Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.