प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

By संतोष हिरेमठ | Published: December 30, 2022 07:32 PM2022-12-30T19:32:43+5:302022-12-30T19:36:23+5:30

चाचणीसाठी १० बोगींची रेल्वे रोटेगाव - औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली

The wait is over, the train ran in Aurangabad with an electric engine at a speed of 100 per hour | प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

googlenewsNext

औरंगाबाद :  रोटेगाव - औरंगाबादरेल्वे मार्गावर अखेर इलेक्ट्रिक इंजिन धावणार आहे. विद्युतीकरण झालेल्या या रेल्वे मार्गाची रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीत चाचणी घेण्यात येत आहे. आगामी दोन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रोटेगाव येथून इलेक्ट्रिक इंजिन १० बोगीसह औरंगाबादकडे सायंकाळी ७ वाजता रवाना झाले आहे. ही रेल्वे रात्री ८ वाजेपर्यंत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येणार आहे. 

विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनासह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली. आता रोटेगाव ते औरंगाबाद पर्यंतच्या विद्युतीकरणाची चाचणी आज घेण्यात येत आहे. रोटेगाव येथून सायंकाळी इलेक्ट्रिक इंजिन औरंगाबादकडे रवाना झाले. इंजिनला १० बोगी आहेत. यावेळी रेल्वेतील अनेक अधिकारी चाचणी संबंधित पाहणी करून माहिती घेत आहेत. 

यापूर्वी रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान लोहमार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर ओव्हरहेड वायरमध्ये १५ डिसेंबर रोजी विद्युत प्रवाह सोडण्याचे नियोजन केले होते. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने लोहमार्गाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये विजेची ओव्हरहेड वायर अडकल्याची घटना १२ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाच्या कामाचे नुकसान झाले. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनसह चाचणीचे नियोजन करण्यात आले.

दोन महिन्यांत जालन्यांपर्यंत काम पूर्ण
मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाद दरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या अडीच ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी रोटेगावपर्यंत धावली इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे
विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन सह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली आहे.

Web Title: The wait is over, the train ran in Aurangabad with an electric engine at a speed of 100 per hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.