आठवडाभराचा संघर्ष विफल; मातेपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याने अखेर मृत्यूला कवटाळले !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:05 PM2022-05-28T12:05:53+5:302022-05-28T12:07:07+5:30

बछड्याची माता व नर बिबटा त्या पिलाजवळून पाच वेळा गेल्याचे

The week-long struggle failed; 'That' calf, separated from its mother, finally embraced death! | आठवडाभराचा संघर्ष विफल; मातेपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याने अखेर मृत्यूला कवटाळले !

आठवडाभराचा संघर्ष विफल; मातेपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याने अखेर मृत्यूला कवटाळले !

googlenewsNext

औरंगाबाद : बिबट मादा आपल्या पिलाला घेऊन जाईल, या अपेक्षेने वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बाजरीच्या शेतात आढळलेल्या नवजात बछड्याचा आठवडाभर सांभाळ केला. मात्र, यातील त्या बछड्याने शुक्रवारी सकाळी मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली.

कन्नड तालुक्यातील मौजे सासेगाव येथील शेतात नवजात बिबट्याचे पिल्लू आढळून आले. त्याची पशुवैद्यकीय अधिकारी महाजन यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. तयाची प्रकृती स्थीर होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनानुसार त्याची काळजी घेतली जात होती. त्या पिलाची व त्यांच्या मातेची भेट घालून देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील होता. बछड्याची माता व नर बिबटा त्या पिलाजवळून पाच वेळा गेल्याचे वन विभागाच्या दबा धरून बसलेल्या टीमने तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बाजरीच्या शेतात व बाजूच्या शेतातही त्यांचे पदमाग पथकाला आढळून आले.

पथकाच्या प्रयत्नाला बछड्याने दिली हुलकावणी ...
या रेस्क्यू टीममध्ये उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार, सहायक वनसंरक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी साळुंखे, शेख, संजय माळी, अमोल वाघमारे, कळंकी, वनपाल चक्रेश महाजन आणि सर्व वनरक्षक यांचा सहभाग होता. या टीमने बछड्याचा जीव वाचविण्याचे बरेच प्रयत्न केले; पण बछड्याने अखेर त्यांना हुलकावणी दिली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले शवविच्छेदन
नवजात बछड्याच्या मृत्यूनंतर गांधेलीकर, कर्वे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्रवारी शवविच्छेदन केले. वन विभागाच्या पथकाने त्यावर अंत्यसंस्कार केले. बछड्याच्या मातेने आता शेतकऱ्यांना इजा करू नये, यासाठी पथक खबरदारी घेणार आहे. बिबट मादीजवळ असलेल्या अन्य पिल्लांमुळे ती चार-पाच वेळा जवळ जाऊनही बास्केटमधील त्या पिलाकडे दुर्लक्ष केले.
- रोहिणी साळुंके (वन परिक्षेत्र अधिकारी, कन्नड)

Web Title: The week-long struggle failed; 'That' calf, separated from its mother, finally embraced death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.