कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 07:15 PM2022-01-19T19:15:33+5:302022-01-19T19:15:52+5:30

पहेलवान व अन्य एकाला गायब केल्याचा नातेवाईकांचा आरोप

The wrestler who won the wrestling disappeared; Wrestling riots in two groups during Adgaon procession without permission! | कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल

कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल

googlenewsNext

चित्तेपिंपळगाव : आडगाव येथे पौष पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या दंगलीमध्ये वडखा येथील पहिलवानास पराभूत करुन देवळाईच्या पहिलवानाने कुस्ती जिंकली आणि वादाची ठिणगी पडली. वादाचे रुपांतर दंगलीमध्ये झाले. जोरदार दगडफेक सुरू झाली. संयोजक व पहिलवानात फ्रिस्टाईल मारामारी झाली. दगडफेकीत उपसरपंचासह देवळाईतील तीनजण गंभीर जखमी झाले असून पहिलवानासह एकास गायब केल्याचा आरोप नातेवाईकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी झाली. रात्री उशिरापर्यंत उपअधीक्षक भवर व चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बेपत्ता तरुणांचा शोध घेत होते.

कोरोनामुळे दोन वर्षे यात्रेवर बंधने होती. यंदाही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना ग्रामस्थांनी विनापरवानगी यात्रा भरविली. कुस्तीची दंगलही आयोजित केली. त्यानंतर सायंकाळी कुस्ती जिंकल्यावरुन खेळात दुजाभाव केला असा आरोप करीत कुस्ती जिंकलीच नाही, परत खेळा मी तयार आहे. असे म्हणत पराभूत वडखा येथील पहिलवानाने गोंधळ घातला. त्याचवेळी अज्ञाताने गर्दीवर दगडफेक केली आणि एकमेकांवर दगडाचा वर्षाव सुरू झाला. संयोजकांनी पहेलवान मुदत्सीर इद्रीस खान, साथीदार जुबेर यूसूफ शेख, अबू सालेब जहुर शेख, आबुजर इद्रीस खान यांना मारहाण केली. दगडफेकीमुळे लोक सैरावैरा पळत होते.

जखमींवर खाजगीत उपचार सुरू
उपसरपंच अशोक लोखंडे यांना छातीत मुका मार लागला असून, त्यांना तसेच जुबेर यूसूफ शेख, अबु सालेब जहुर शेख, आबुजर इद्रीस खान यांना शासकीय दवाखान्यातून खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

बेपत्तांची उशिरापर्यंत शोधमोहिम
देवळाई येथील विजयी पहेलवान मुदत्सीर इद्रीस खान, समीर खान आयुब खान या दोघांचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांना शोध लागला नव्हता. नातेवाईकांचा आरोप आहे की, दोघांना गावकऱ्यांनीच डांबून ठेवले असावे. रात्री चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. पोलीस अधीक्षकानी दिलेल्या सूचनांनुसार पोलिसाच्या पथकाने जाऊन बेपत्ता पहिलवानांची शोधमोहिम राबविली. अन्य तीन जणांची एका घरातून सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The wrestler who won the wrestling disappeared; Wrestling riots in two groups during Adgaon procession without permission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.