निवृत्त कृषी अधिकाºयाच्या घरी ५ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:42 AM2017-10-03T00:42:48+5:302017-10-03T00:42:48+5:30
सहकुटुंब बंगल्यात झोपलेल्या कृषी अधिकाºयाचे घर फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि रोख १ लाख ३० हजार रुपये चोरून नेले. ही घटना १ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेनंतर व्यंकटेशनगरात घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सहकुटुंब बंगल्यात झोपलेल्या कृषी अधिकाºयाचे घर फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि रोख १ लाख ३० हजार रुपये चोरून नेले. ही घटना १ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेनंतर व्यंकटेशनगरात घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की, कृषी विभागातील निवृत्त अधिकारी अंकुश गुलाबराव कोलते (६५) यांचा व्यंकटेशनगरमध्ये सहा रूमचा बंगला आहे. रविवार, १ आॅक्टोबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्या तीन वेगवेगळ्या खोल्यामध्ये कोलते पती-पत्नी, मुलगा अनुपकुमार, सून, विवाहित मुलगी आणि वृद्ध आई असे सर्व जण आपापल्या खोलीत झोपले. आॅस्ट्रेलियातून आलेल्या त्यांच्या आर्किटेक्ट मुलीने रात्री दीडपर्यंत लॅपटॉपवर काम केले. त्यानंतर ती दुसºया खोलीत झोपण्यासाठी गेली. बंगल्यातील सर्वात मागील एका बेडरूममध्ये त्यांचे लोखंडी कपाट, लाकडी आलमारी आहे.