जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चोरी; दूकाने फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:16 PM2020-08-25T16:16:29+5:302020-08-25T16:26:34+5:30
दोन्ही आरोपींकडून ६ दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आल्या
औरंगाबाद: बीड बायपासवरील नोबल फार्मा हे औषधी दुकान आणि विश्रांतीचौकातील किराणा दुकान, दारू दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत अटक केली. यावेळी चोरट्यांकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
आकाश भीमराव शिंदे ( १९, रा. गौतमनगर , आंबेडकरनगर) आणि गजानन सुभाष मकळे (२०, रा.मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, विश्रांतीनगर येथील हिम्मत पटेल यांचे किराणा दुकान चोरट्यानी तीन वेळा फोडून माल पळविला होता. याविषयी त्यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या गुंह्याचा तपास सुरू असतांना विश्रांतीनगर येथील दारू दुकान आणि बायपास वरील नोबल फार्मा हे औषधी दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी रोख ६ हजार रुपये चोरून नेले.
जटवाडा रोडवर दोन तास सुरू होता दोन चोरट्यांचा धुमाकूळ #crime#Aurangabadhttps://t.co/4i39W9ez39
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020
या घटनेने पोलिसांत खळबळ उडाली आणि चोरांचा कसून शोध सुरू केला. तेव्हा सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार प्रभाकर सोनवणे, हवालदार रमेश सांगळे ,दादाराव पवार, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ , रवी जाधव , दिपक जाधव यांच्या पथकाने दोन्ही संशयित आरोपींना मुकुंदवाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुकाने फोडल्याची आणि विविध ठिकाणाहून सहा मोटारसायकली चोरल्याची गुंह्याची कबुली त्यांनी दिली. चोरलेल्या सहा मोटारसायकल पोलिसांच्या हवाली केल्या.
आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील चोरटे आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर जामीनावर सुटल्यावर ते पुन्हा गुन्हा करतात अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. आरोपींकडुन शहराच्या वेगवेगळ्या दुकानफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली.
येथील १२ साधक कोरोनाबाधित झाले आहेत #coronavirushttps://t.co/sB2mtMquUY
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020