साडेपाच लाखांची चोरी
By Admin | Published: November 16, 2014 12:07 AM2014-11-16T00:07:01+5:302014-11-16T00:07:01+5:30
वाळूज महानगर : तीन आठवड्यांपूर्वी वासन टाटा आॅटोमोटिव्ह कंपनीत साडेपाच लाख रुपयांची चोरी करणाऱ्या चौघा संशयित कर्मचाऱ्यांना वाळूज पोलिसांनी अटक केली.
वाळूज महानगर : तीन आठवड्यांपूर्वी वासन टाटा आॅटोमोटिव्ह कंपनीत साडेपाच लाख रुपयांची चोरी करणाऱ्या चौघा संशयित कर्मचाऱ्यांना वाळूज पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील आॅटोमोटिव्ह कंपनीच्या छतावरील दरवाजातून कंपनीच्या अकाऊंट रूममध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता. चोरट्यांनी कॅश बॉक्समधील ५ लाख ४० हजार रुपये लांबविले होते. सोमनाथ बाळू भगत (३३, रा. हिंदुस्तान समूह आवास सोसायटी, नक्षत्रवाडी) यांनी वाळूज पोलीस ठाणे गाठून कंपनीतून ५ लाख ४० हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दिली.
या प्रकरणी कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आल्यामुळे विजय लक्ष्मण नितनवरे (३८, रा. भारतनगर, वाळूज), रावसाहेब लक्ष्मण खरात (४३, रा. भगतसिंगनगर, वाळूज) सिद्धार्थ पुंडलिक जाधव (४६, रा. रांजणगाव शेणपुंजी) व असित कांतीलला कोठावाल (३९, रा. उस्मानपुरा) यांना सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे, पोकॉ. व्ही.जी. कांबळे, पोकॉ. एस.एम. तडवी यांनी अटक केली. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे हे करीत आहेत.