...तर शेतकरी पुन्हा संप करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:05 AM2018-02-25T00:05:39+5:302018-02-25T00:05:43+5:30

राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी शेतकºयांनी संप पुकारला होता. तेव्हा राज्य सरकारने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीशी केलेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य करत त्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला होता. मात्र, सरकारने शेतकºयांच्या एकाही मागणीची पूर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली.

... then the farmers will end again | ...तर शेतकरी पुन्हा संप करतील

...तर शेतकरी पुन्हा संप करतील

googlenewsNext
ठळक मुद्देइशारा : शेतकरी सुकाणू समितीने जाहीर केली आंदोलनाची दिशा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी शेतकºयांनी संप पुकारला होता. तेव्हा राज्य सरकारने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीशी केलेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य करत त्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला होता. मात्र, सरकारने शेतकºयांच्या एकाही मागणीची पूर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली.
स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकरी संघटनांसह शेतीसंबंधी कार्य करणाºया सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक शनिवारी (दि.२४) पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, किशोर ढमाले, सुभाष लोमटे, एच. एम. देसरडा, सुखदेव बन, काझंमभाई, रमेश खंडागळे, मनोहर टाकसाळ, भगवान भोजने, मिलिंद पाटील, रंगनाथ येवले, कचरू वाखडे, ज्ञानेश्वर भारती आदी उपस्थित होते.
सुकाणू समितीच्या सदस्यांनी सांगितले की, राज्य सरकारने सुकाणू समितीशी चर्चा करताना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळण्यात आले नाही.
यामुळे सुकाणू समितीतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात २३ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान ‘किसान जनजागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा, शेतकरी आंदोलन, विद्यापीठ नामांतराच्या लढ्यातील शहीद आणि आत्महत्या केलेल्या शेतकºयांना अभिवादन केले जाणार
आहे.
सरकारला केवळ इशारा देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेनंतरही सरकारने शेतकºयांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी आंदोलन पहिल्यापेक्षा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वेळी शेतकरी संपावर गेले होते.
या संपासारखेच तीव्र आंदोलनाचे हत्यार जून महिन्यादरम्यान काढण्यात येणार असल्याचेही सुकाणू समितीच्या सदस्यांनी सांगितले.
ना कर्ज, ना कर
सुकाणू समितीच्या बैठकीत राज्य सरकार जोपर्यंत शेतकºयांच्या मागण्या मान्य करत नाही. तोपर्यंत शेतकरी सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. शेतकरी कोणतेही कर, लाईट बिल आणि बँकांचे कर्ज भरणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी आले तरी त्यांना वसुली करू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: ... then the farmers will end again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.