...तर नारेगावचा कचरा तसाच सडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:06 AM2018-03-04T00:06:19+5:302018-03-04T00:06:25+5:30

मनपाने कचरा टाकण्यासाठी दुसरीकडे जागा शोधली तर नारेगाव डेपोतील कचरा विनाप्रक्रिया तसाच सडण्याची शक्यता आहे. त्या कच-यावर बायो मायनिंग करण्याचा खर्च पालिका करणारच नाही. त्यामुळे नारेगाव येथील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

... then the garbage of Naregaon would be as dry as possible | ...तर नारेगावचा कचरा तसाच सडेल

...तर नारेगावचा कचरा तसाच सडेल

googlenewsNext
ठळक मुद्देबायो मायनिंगकडे होईल दुर्लक्ष : २० लाख मेट्रिक टन कचरा डेपोत विनाप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनपाने कचरा टाकण्यासाठी दुसरीकडे जागा शोधली तर नारेगाव डेपोतील कचरा विनाप्रक्रिया तसाच सडण्याची शक्यता आहे. त्या कच-यावर बायो मायनिंग करण्याचा खर्च पालिका करणारच नाही. त्यामुळे नारेगाव येथील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
नारेगाव-मांडकीतील डेपोमध्ये २० लाख मेट्रिक टन म्हणजे १० लाख क्युबिक मीटर कचरा सध्या विनाप्रक्रिया पडून आहे. त्यामुळे त्या कचºयाच्या दुर्गंधीमुळे १४ गावे प्रदूषणाच्या विळख्यात आली आहेत. ३२ वर्षांपासून तेथे कचरा टाकला जातो आहे. ५ लाख क्युबिक मीटर म्हणजेच १० लाख मेट्रिक टन कच-यावर बायो मायनिंग प्रक्रिया करण्यात येईल, असे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, मनपाने दुसरी जागा शोधली तर नारेगावातील कचरा तसाच राहील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यास त्यांना शासनाने नेमलेल्या समितीमार्फत दाद मागता येईल. सध्या पडून असलेल्या कचºयावर मनपाकडून प्रक्रिया करून घेता येईल. शिवाय नारेगाव व परिसरातील आंदोलकांचा समितीमध्ये समावेश केला जाईल. प्रत्येक बैठकीला ते असतील, त्यामुळे त्यांच्यासमक्ष सर्व काही होईल.
बायो मायनिंगचा कुठे-कुठे प्रयोग करण्यात आला आहे, त्यावर आयुक्त मुगळीकर म्हणाले, जबलपूर व इतर ठिकाणी प्रयोग यशस्वी झाला आहे. ४८ कोटींचा डीपीआर यासाठी केला आहे. १५० दिवस निविदा प्रक्रियेसाठी लागतील. त्यात बायो मायनिंगचे टेंडर वेगळे असेल. कचºयाचे वर्गीकरण करावे लागेल. प्लास्टिक व इतर कचरा वेगळा करावा लागेल. त्या डेपोमध्ये विंडो करून चर खोदावे लागतील.
लोकप्रतिनिधी, प्रशासन हतबल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, आ.इम्तियाज जलील, आ.अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाचे पदाधिकारी १५ दिवसांपासून हतबल आहेत. तर विभागीय, जिल्हा, पालिका, पोलीस प्रशासनही लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे काहीही निर्णय घेत नसल्यामुळे पूर्ण शहराची कचराकोंडी झाली आहे.
विरोध करणा-यांवर गुन्हे दाखल करू
जेथे विरोध होईल, तेथील विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातील. नारेगाव वगळून मनपा हद्दीतील जागांवर जेथे विरोध होतो आहे तेथे पोलीस बळाचा वापर केला जाईल. विरोध करणाºया नगरसेवक व नातेवाईकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. कांचनवाडीत ४० एकर मनपाची जागा आहे. तेथे कचरा टाकण्यास शनिवारी विरोध झाला. मनपाच्या चार वाहनांवर दगडफेक झाली, असे आयुक्त मुगळीकर म्हणाले.

Web Title: ... then the garbage of Naregaon would be as dry as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.