चित्रकलेत करिअरसाठी तंत्रकौशल्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:09 AM2018-02-07T00:09:43+5:302018-02-07T00:09:49+5:30
‘चित्रकलेचे रीतसर प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तांत्रिक कौशल्ये अवगत करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला चित्रकार फारुख नदाफ यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशवंत कला महाविद्यालयात सुरू असलेल्या पाचव्या ‘कलाउत्सव’ या चित्र व शिल्प प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी (दि.६) त्यांनी तैल रंगांमध्ये व्यक्तीचित्रण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी ते जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘चित्रकलेचे रीतसर प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तांत्रिक कौशल्ये अवगत करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला चित्रकार फारुख नदाफ यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशवंत कला महाविद्यालयात सुरू असलेल्या पाचव्या ‘कलाउत्सव’ या चित्र व शिल्प प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी (दि.६) त्यांनी तैल रंगांमध्ये व्यक्तीचित्रण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी ते जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
चित्रकला महाविद्यालयातून बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक वाटेवर न जाता गेमिंग, अॅनिमेशन, व्हीएफएक्स अशा तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, रविवारी राकेश सूर्यवंशी यांनी पोर्टेट आणि लँडस्के पचे, तर सोमवारी अप्पासाहेब काटे यांनी अमूर्त चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखविले.
सदरील प्रदर्शनात मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वस्तूंचे चित्र, डिझाईन, त्रिमितीय डिझाईन, मुद्रा चित्रण, चित्रात्मक संकल्प, अमूर्त चित्र (क्रिएटिव्ह चित्र), व्यक्तीचित्रण, निसर्गचित्रे अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्रे पाहायला मिळतात. नवचित्रकारांच्या कल्पक सृजनातून साकार झालेले हे रंगाविष्कार म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच!
टेक्स्टाईल पेंटिंग या गटात विणकाम आणि प्रिंटिंग प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींचा समावेश आहे.
धागा धागा विणून स्वयंचित्रणाचा (सेल्फ पोर्ट्रेट) छान प्रयोग लक्ष वेधून घेतो. शिल्पकलेमध्ये अखंड दगडाला कोरून साकारलेली शिल्पे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरत आहे. यामध्ये मासा आणि बैलाचे शिल्प पुरस्काराचे मानकरी ठरले.
फायबरपासून तयार केलेला मोर आणि आई-मुलीचे शिल्पदेखील प्रभावित करते. अंतर्गृह सजावटीमध्ये मॉल, घर, दुकाने, बंगले यांचे माऊं ट बोर्डपासून तयार केलेले मॉडेल्स येथे आहेत.