व्यायामासाठी वयाचे बंधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:02 AM2021-05-24T04:02:11+5:302021-05-24T04:02:11+5:30

आस्था फाऊंडेशनतर्फे दि. २२ रोजी ‘आरोग्यदायी दीर्घायुषी जगण्याची मधुकला’ याविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८८ वर्षे ...

There is no age limit for exercise | व्यायामासाठी वयाचे बंधन नाही

व्यायामासाठी वयाचे बंधन नाही

googlenewsNext

आस्था फाऊंडेशनतर्फे दि. २२ रोजी ‘आरोग्यदायी दीर्घायुषी जगण्याची मधुकला’ याविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८८ वर्षे वयाचे तडफदार व्यक्तिमत्व मधुकर तळवलकर यांनी उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधला. फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य यांनी त्यांचे स्वागत केले.

व्यायामाचे महत्त्व सांगताना तळवलकर म्हणाले की, १२५ ते १५० वर्षे टिकेल, अशी आपल्या शरीराची रचना केलेली आहे. परंतु आपणच शरीराकडे दुर्लक्ष करून आयुष्य कमी करून घेतो. सकारात्मक रहा, मी सर्वोत्तम आहे, असे म्हणून स्वत:शीच संवाद साधा. योगा, धावणे, चालणे, दंडबैठका असा नियमित व्यायाम करा. व्यायामाचा ध्यास घ्या. तुमची ताकद, लवचिकता वाढवा. संतुलित आहार घ्या. आपण चांगले दिसले पाहिजे असा विचार करा. ताठ चाला आणि त्यासाठी व्यायाम करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी स्वत:चे उदाहरण देत पटवून दिले. संस्थेचे उपाध्यक्ष आशिष गर्दे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फोटो ओळ :

व्यायामाचे महत्त्व सांगताना मधुकर तळवलकर.

Web Title: There is no age limit for exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.