तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जामीन नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:32+5:302021-08-01T04:04:32+5:30
औरंगाबाद : कामावर गेलेल्या आईकडे सोडतो, असे सांगून एका तरुणीला म्हैसमाळ येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा रवी ...
औरंगाबाद : कामावर गेलेल्या आईकडे सोडतो, असे सांगून एका तरुणीला म्हैसमाळ येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा रवी आसाराम दराडे याचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी नामंजूर केला. सरकारतर्फे सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी आरोपीच्या जामिनास विरोध केला.
--------------------------------------------------
फिर्यादीला गंभीर जखमी करणाऱ्याचा जामीन नाकारला
औरंगाबाद : फिर्यादी ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे यांना चार ते पाच जणांनी दांडा आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात लक्ष्मण शंकर दहिहंडे याचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही.पी. कदम यांनी नामंजूर केला. सहायक लोकअभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी लक्ष्मणच्या जामीन अर्जास विरोध केला. त्यांना ॲड. अविनाश कोकाटे यांनी साहाय्य केले.
-------------------------------------------
चोराला पोलीस कोठडी
औरंगाबाद : पाण्याची मोटार आणि लोखंडी टेबल चोरणारा सय्यद सुभान सय्यद जिलानी याला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी दिले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------
बायोडिझेलचा काळाबाजार करणारे सातही आरोपी तुरुंगात रवाना
औरंगाबाद : वर्षभरापासून बायोडिझेलचा काळाबाजार करणारे इरफान खमर खान, जाहेद हमीद शेख, जयराम लिंबाजी चव्हाण, शेख तखीयोद्दीन शेख अहेमद मोहीयोद्दीन, मोहसीन खान मोहम्मद खान, शाकेर खान इफ्तेखार खान आणि बाळासाहेब चिमाजी आहेर या सातही आरोपींची न्यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शनिवारी दिले.
-------------------------------------------------