आघाडीची तूर्त घाई नाही, योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:54 AM2018-01-31T04:54:53+5:302018-01-31T04:55:29+5:30

आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची याची तूर्त घाई नाही. योग्य वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत उठलेल्या वावड्यांवर पडदा टाकला.

There is no hurry for the foremost, it will make the decision on time at the right time | आघाडीची तूर्त घाई नाही, योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

आघाडीची तूर्त घाई नाही, योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

googlenewsNext

औरंगाबाद : आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची याची तूर्त घाई नाही. योग्य वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत उठलेल्या वावड्यांवर पडदा टाकला.
काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, कोणासोबत आघाडी करायची यावर अजून निर्णय झालेला नाही. योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. शिवसेनेशी हातमिळवणी करणार काय? या प्रश्नावर ते म्हणाले, हातमिळवणीचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी हा पक्ष सत्तेबाहेर पडू शकणार नाही. एकनाथ खडसे यांना भाजपाने पक्षाबाहेर ढकलले तर त्यांना पक्षात घेऊ असेही ते म्हणाले़

कोरेगाव भीमाची दंगल एक मोठे षड्यंत्र
कोरेगाव भीमाची दंगल हे एक मोठे षड्यंत्र होते. जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यामागे हेतू होता; पण तो फसला. सरकारने मात्र या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतली. उलट कोम्बिंग आॅपरेशनच्या नावाखाली दलित बांधवांना त्रास दिला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

Web Title: There is no hurry for the foremost, it will make the decision on time at the right time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.