स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:07 AM2017-09-15T01:07:28+5:302017-09-15T01:07:28+5:30

जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले

 There is no option without research in the age of competition | स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही

स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जगभरातील स्पर्धेचा विचार केला तर या युगात उत्पादन आणि दर्जा वाढवायचा असेल तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे मत यूपीटीयूचे माजी कुलगुरू डॉ. प्रेम व्रत यांनी आयसीएमआयई परिषद- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. जेएनईसी आणि आयआयआयईतर्फे (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग) आयोजित दोन दिवसीय परिषदेला एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात गुरुवारी सुरुवात झाली.
उत्पादकता विकास आणि उत्पादनाचा दर्जा वाढविला तरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपण तग धरू शकतो. संशोधन आणि विकास या दोन मूलभूत घटकांकडे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रांनी सहकार्याने प्रगती करणे गरजेचे आहे, असेही डॉ. व्रत म्हणाले.
आयआयआयईचे संचालक डॉ. भास्कर भांडारकर म्हणाले, संशोधनातून देशाला प्रगतिपथावर न्यावे. संशोधन आणि विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. आर. पी. मोहंती, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, आयआयआयई औरंगाबादचे सचिव डॉ. अभय कुलकर्णी, संयोजक डॉ. धनंजय डोळस आदींची उपस्थिती होती. डॉ. कुलकर्णी यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. डोळस यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. औरंगाबादचे चेअरमन डॉ. सुधीर देशमुख यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अस्मिता जोशी यांनी केले, तर आभार डॉ. एम. एस. कदम यांनी मानले. आयआयआयईच्या विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेसाठी अनुप गोयल, अरुण कुलकर्णी, प्रा. डॉ. एच. एच. शिंदे, डॉ. विजया मुसांडे यांनी परिश्रम घेतले.
परिषदेनिमित्त ‘उत्पादकता विकास आणि त्या समोरील आव्हाने’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय संमेलन होत आहे. देशभरातील १५० शोधनिबंध या परिषदेसाठी निवडण्यात आले आहेत. परिषदेचा १५ सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे.

Web Title:  There is no option without research in the age of competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.