अटल सौर कृषीपंप योजनेची प्रसिद्धीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:30 AM2017-09-26T00:30:15+5:302017-09-26T00:30:15+5:30
राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी या योजनेची प्रभावी जनजागृती व प्रसिद्धी करावी व अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी या योजनेची प्रभावी जनजागृती व प्रसिद्धी करावी व अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. आपले सरकार पोर्टलवर तक्रार करून योजनेची मुदत वाढविण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
महाराष्टÑ शासनाने अपारंपरिक उर्जा निर्मिती व अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा विकास व प्रोत्साहन देण्यासाठी सौर उर्जेवर आधारित सौरऊर्जा कृषीपंप अनुदानावर शेतकºयास देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत दहा एकराच्या आतील पात्र शेतकºयांना ९५ टक्केपर्यंत अनुदानावर सौरऊर्जा कृषीपंप मिळणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात ही योजना आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती या योजनेतील लाभार्थी निवडणार आहे. मात्र या योजनेची प्रसिद्धी किंवा जनजागृतीच झाली नाही.
शेतकºयांपर्यंत योजनाची माहिती पोहोचण्यापूर्वीच लाभार्थींचा अर्ज घेण्याची प्रक्रिया संपल्याने आता शेतकºयांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत वसमत तालुक्यातील गुंज येथील उपसरपंच प्रकाश नरवाडे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली. यात सौरऊर्जा कृषीपंप योजनेची माहितीच महावितरणने शेतकºयांना होऊ दिली नसल्याचे नमूद केले आहे. गरजू शेतकºयांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी व अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी प्रकाश नरवाडे यांनी केली आहे.
सौरऊर्जा कृषीपंप योजना जाहीर न होताच लाभार्थ्यांची अर्जाची गर्दी झाली हे तर राजकीय शेतकरी किंवा राजकारणाच्या मर्जीतील कार्यकर्तेच असावेत, अशी शंकाही प्रकाश नरवाडे यांनी व्यक्त केली आहे.