औरंगाबादच्या कचरा निर्र्मूलनात गांभीर्य नाही -विभागीय आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:21 AM2018-05-10T01:21:21+5:302018-05-10T01:22:51+5:30
विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला. मनपाची यंत्रणा गांभीर्याने काम करण्यास तयार नसल्याचा आरोप करीत त्यांनी प्रशासनातील उणिवांवर बोट ठेवले. ८३ दिवसांपासून शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीची समस्या उभी आहे. ओला व सुका असा वर्गीकरण केलेला कचरा संकलन करण्यात पालिकेला १०० टक्के यश आलेले नाही. सफाई कर्मचाºयांची मोठी फौज असताना नियंत्रण म्हणून काम करणारे अधिकारी याबाबत गंभीर नाहीत. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. यंत्रणा नापास करण्यास जबाबदार वॉर्ड अधिकाºयांवर कारवाई करा. आराखडा तयार केला, ३९ जागा निश्चित केल्या. तरीही पालिका प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर कोर्टाची बेअदबी होईल. जागांचा वापर करण्यास टाळाटाळ, जास्तीचा कचरा उत्सर्जित करून वर्गीकरण न करणाºयांवर काय कारवाई केली. याबाबतचा सगळा गंभीर अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे डॉ.भापकर म्हणाले.
किती कचरा निघतो शहरात
९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत २३० मेट्रिक टन ओला कचरा शहरात जमा होतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर दर बैठकीत १०० मेट्रिक टनाने कचºयाच्या निर्मितीचा आकडा वाढत गेला. डीपीआर करणाºया संस्थेने ६५०.४३ मेट्रिक टन कचरा निघतो असे सांगितले आहे. पॉइंट ४३ मेट्रिक टन इतक्या बारकाईने खरंच कचºयाच्या निर्मितीचे संशोधन झाले आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी आयुक्तांना केला. यावर नगरपालिका प्रशासन उपसंचालक रीता मैत्रेवार यांनी पुढील काही वर्षांतील लोकसंख्या आणि कचरानिर्मितीचा त्यात अभ्यास करण्यात आल्याचे नमूद करून वेळ मारून नेली. ही सगळी आकडेमोड अर्थकारणाभोवती फिरत असल्याचा संशय येतो आहे. तीन वेळा निविदा मागवूनही मशिनरी पुरविण्यासाठी कंत्राटदार मिळत नाही. या सगळ्यामागे नेमके काय कारण आहे, यावर डॉ.भापकर म्हणाले, पालिकेकडून याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.
१४ मे रोजी आयुक्त येणार
१४ मे रोजी मनपा आयुक्त निपुण विनायक रुजू होतील. त्यानंतर पूर्णपणे पालिकेच्या कामकाजाबाबत निर्णय घेणे शक्य होईल. आयुक्त नसल्यामुळे काही अडचणी येत असतील; परंतु ते रुजू झाल्यानंतर कचºयाच्या कामाचा आढावा घेऊन निर्णय घेतील, असे डॉ.भापकर म्हणाले. कचºयाच्या प्रकरणातून मनपाने तातडीने बाहेर पडले पाहिजे. शहरात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांचे प्रश्न आहेत. रोज कचºयावर बैठका घेतल्यास इतर कामांसाठी कधी वेळ देणार. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई व शहरात १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण होऊन प्रक्रियेला सुरुवात होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.