विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना पिण्यासाठी पाणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:59 AM2018-03-13T00:59:54+5:302018-03-13T01:00:14+5:30
: विभागात क्रीडा संस्कृती रुजावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावे या उदात्त हेतूने शासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु या हेतूला मात्र तडा गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता उन्हाळा सुरूझाला आहे आणि त्यामुळे कसून सराव करीत असताना पाणी पिण्याची गरज खेळाडूंना असते; परंतु विभागीय क्रीडा संकुलावर पिण्याचे पाणीच नसल्यामुळे चक्क महिला पालकांनीच याविषयी पुढाकार घेतला असून त्यांनी याविषयी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना सोमवारी सायंकाळी एक लेखी निवेदन दिले आहे.
औरंगाबाद : विभागात क्रीडा संस्कृती रुजावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावे या उदात्त हेतूने शासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु या हेतूला मात्र तडा गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता उन्हाळा सुरूझाला आहे आणि त्यामुळे कसून सराव करीत असताना पाणी पिण्याची गरज खेळाडूंना असते; परंतु विभागीय क्रीडा संकुलावर पिण्याचे पाणीच नसल्यामुळे चक्क महिला पालकांनीच याविषयी पुढाकार घेतला असून त्यांनी याविषयी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना सोमवारी सायंकाळी एक लेखी निवेदन दिले आहे.
या लेखी निवेदनात पालकांनी त्याच्या निवेदनात म्हटले की, विभागीय क्रीडा संकुलात हजारो खेळाडू विविध खेळांचा सराव करतात; परंतु सरावादरम्यान त्यांना तहान लागल्यास कोठेही पाण्याची सोय नाही, तसेच सराव करताना दुखापत झाल्यास प्राथमिक उपचार पेटीही तेथे उपलब्ध नसते. पाणी नसल्यामुळे खेळाडूंची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विभागीय क्रीडा संकुलात शौचालये आहेत; परंतु तेथे स्वच्छता नसते आणि पाणीही नसते. अॅथलेटिक्स मैदानावर सायंकाळी सराव करताना लाईट नसतो. तसेच तेथे असणाºया नाल्यांवरील ढापे तुटलेले आहेत. त्यामुळे खेळाडूचे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. या निवेदनावर ९२ पालकांच्या स्वाक्षºया आहेत.
पाणीपट्टी न भरल्याने होतेय खेळाडूंची गैरसोय
महानगरपालिकेने विभागीय क्रीडा संकुलाला पाण्यासाठी व्यावसायिक दर लावले आहे आणि दर अधिक असल्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाने मनपाची पाणीपट्टीची पूर्ण रक्कम भरली नाही. तथापि, याविषयी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा केली असून, विभागीय क्रीडा संकुलाला पाणी हे व्यावसायिक दराने देऊ नये, असे सांगितले आहे. याविषयी आपण मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे. पाण्याच्या अभावामुळेच खेळाडूंची गैरसोय होत आहे आणि शौचालयेही स्वच्छ नाहीत. ही गैरसोय लवकरच दूर करण्यात येणार आहे. तसेच मैदानावर लाईटची व्यवस्था केली जाईल आणि अॅथलेटिक्स मैदानावरील तुटलेले ढापे लवकरच बदलण्यात येईल, असे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.