कचरा डेपो हटविल्याशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:29 AM2017-10-13T00:29:33+5:302017-10-13T00:29:33+5:30

आता डेपो हटविल्याशिवाय माघार नाही. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत, असा एल्गार मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पुकारला आहे

There is no withdrawal without removing garbage depots | कचरा डेपो हटविल्याशिवाय माघार नाही

कचरा डेपो हटविल्याशिवाय माघार नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मांडकीची ४४ एकर गायरान जमीन कचरा डेपोसाठी मनपाने घेऊन पंचक्रोशीत अस्वच्छता पसरविली आहे. डेपो हटविण्याच्या हालचालीला हेतुपुरस्सर ब्रेक दिला जात आहे. आता डेपो हटविल्याशिवाय माघार नाही. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत, असा एल्गार मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पुकारला आहे, असे पत्रकार परिषेदत पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक, मनोज गायके यांनी सांगितले.
१९८३-८४ पासून ४४ एकर गायरान जमिनीवर कचरा डेपो सुरू केला. सुरुवातीला अनेक शेतक-यांनी डेपोतून कुजलेला कचरा खत म्हणून उचलूनदेखील नेला; परंतु ३५ वर्षांपासून या डेपोतील विदारक परिस्थिती व मरणयातना शेतकरी व नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दोन वेळा कच-यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न फक्त केंद्र शासनाचे अनुदान लाटण्यासाठी झाला. खतनिर्मिती, गॅसनिर्मिती अशी मोठी आश्वासने दाखवून जनतेला पुन्हा प्रदूषणात झोकून दिले आहे. किरकोळ वाटणाºया डेपोत ३५ वर्षांत ६० फूट उंचीचा कच-याचा डोंगर उभा राहिला असून, त्याला हटविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणार होत असून, वायू, जल प्रदूषण झाल्याने खेड्यातील नागरिकांना डोकेदुखी, त्वचारोगाचे आजार आढळून येत आहेत. मनपाने एकदाही आरोग्यसेवा किंवा शेजारच्या खेड्यात जनतेला सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला नाही. रस्त्याविषयी विचारले असता तो आमच्या हद्दीत येत नाही असा बहाणा मात्र केला जातो. कचरा डेपो आमच्या हद्दीत मग कशाला टाकता. तो त्वरित हटवावा, आता माघार नाही, असा निर्धार पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक यांनी केला आहे.
जोपर्यंत डेपो हलविणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. गुन्हे दाखल करा अन्यथा तुरंगात पाठवा, मनपाच्या ढिसाळपणाला वठणीवर आणणारच, असा इशारा उपसरपंच साईनाथ चौथे, मदन डक, जगदीश चक्कर, रियाज शाह, विष्णू भेसर, संतोष डक, सय्यद पटेल, उपसरपंच अनिल हिवर्डे, रतन काळे, भाऊसाहेब गायके आदींनी दिला आहे.

Web Title: There is no withdrawal without removing garbage depots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.