मराठवाड्यात सरासरीपेक्षा अजूनही कमीच पाऊस
By Admin | Published: July 10, 2016 12:38 AM2016-07-10T00:38:41+5:302016-07-10T00:58:21+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे; परंतु विभागात पडलेला पाऊस हा आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमीच आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे; परंतु विभागात पडलेला पाऊस हा आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमीच आहे. मराठवाड्यात अजूनही आतापर्यंत सरासरीच्या ८९ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. केवळ नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्यामुळे पावसाला उशिराने सुरुवात झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.