चावी देण्यावरून झाला वाद; पत्नीचे डोके भिंतीवर आदळून दारुड्या पतीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

By राम शिनगारे | Published: April 14, 2023 08:41 PM2023-04-14T20:41:35+5:302023-04-14T20:41:49+5:30

पतीच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद

There was a dispute over giving the bike key; Drunken husband attempts to kill wife by hitting her head against the wall | चावी देण्यावरून झाला वाद; पत्नीचे डोके भिंतीवर आदळून दारुड्या पतीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

चावी देण्यावरून झाला वाद; पत्नीचे डोके भिंतीवर आदळून दारुड्या पतीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

छत्रपती संभाजीगनर : दारू पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीस दुचाकीची चावी मागितली. गाडीची चावी देण्यास पत्नीने नकार देताच पतीने वाद घातला. वादातच पत्नीचे डोके भिंतीवर आदळले. यात जखमी झाल्यानंतर पतीने पत्नीचे तोंड उशीने बादूने जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी १३ एप्रिल रोजी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

योगेश एकनाथ राठोड (४०, रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर) असे जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेशची पत्नी संघश्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ एप्रिल रोजी दुपारीच पती दारू पिऊन घरी आला. त्याने संघश्री यांच्याकडे दुचाकीची चावी मागितली. तेव्हा त्यांनी देण्यास नकार दिला. त्यावरून दोघात वाद सुरू झाले. या वादात आरोपीने त्यांना बेदम मारहाण केली. तसेच डोके भिंतीवर आदळले. यात त्या गंभीर जखमी होऊन कोसळल्या. त्यानंतर आरोपीने तुला आता मी जिवंत सोडणार नाही, मारून टाकतो, असे म्हणून घरातील उशीने त्यांचे तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संघश्री यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास उपनिरीक्षक चाबुकस्वार करीत आहेत.

Web Title: There was a dispute over giving the bike key; Drunken husband attempts to kill wife by hitting her head against the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.