बाजारसावंगी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रुग्ण ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:02 AM2021-05-27T04:02:17+5:302021-05-27T04:02:17+5:30
बाजारसावंगी : चोहीकडे कोरोना रोगाची महामारी सुरू असताना बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी दुपारपर्यंत एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. ...
बाजारसावंगी : चोहीकडे कोरोना रोगाची महामारी सुरू असताना बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी दुपारपर्यंत एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले.
परिसरातील पंचवीस खेड्यांतील नागरिकांना बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा पुरविते. येथे तीन आरोग्य अधिकारी नियुक्त आहेत. आरोग्य सेवा पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. मंगळवारी येथे सकाळपासून उपचारासाठी अनेक रुग्ण आले होते. मात्र, तीनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी दुपारपर्यंत उपस्थित नव्हता. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत रुग्णांना सुमारे पाच तास ताटकळत बसावे लागले. यामुळे काही रुग्णांना त्रास होत असल्याने त्यांनी खासगी दवाखान्याचा रस्ता पकडला. याप्रकरणी पुंजाजी नलावडे यांच्यासह इतर नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. फोटो : बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले नागरिक.
250521\235520210525_095854_1.jpg
बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले नागरिक.