(चर्चा तर होणार...) सोशल मीडियावर कडक निर्बंध हवेत का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:02 AM2021-09-06T04:02:12+5:302021-09-06T04:02:12+5:30

....................................................................................................................... कडक कायद्याची गरज ही गोष्ट खरीच आहे की, सोशल मीडियावर फेक न्यूज आणि बदनामीमूलक पोस्टचा धुमाकूळ सुरू ...

(There will be a discussion ...) Are there strict restrictions on social media? | (चर्चा तर होणार...) सोशल मीडियावर कडक निर्बंध हवेत का

(चर्चा तर होणार...) सोशल मीडियावर कडक निर्बंध हवेत का

googlenewsNext

.......................................................................................................................

कडक कायद्याची गरज

ही गोष्ट खरीच आहे की, सोशल मीडियावर फेक न्यूज आणि बदनामीमूलक पोस्टचा धुमाकूळ सुरू असतो. एकीकडे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे, तर दुसरीकडे त्यावर कुणाचेच कडक नियंत्रण नाही. यासंदर्भात सध्या आहेत त्यापेक्षाही कडक कायदे बनविण्याची गरज आहे. चुकीची माहिती देणे, चारित्र्यहनन करणे, धार्मिक व जातीय भावना भडकावणे, हे कधीच हिताचे असू शकत नाही. त्यासाठी आणखी कडक कायद्याची गरज आहे.

- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद

.............................................................................................................

सध्याही कलम आहेतच

जातीय विद्वेष पसरविणे, धार्मिक भावना भडकाविणे, फेक न्यूज देणे, हे चुकीचेच आहे. याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यावर आळा घालण्यासाठी भादंवि २९५ व इतर कलमे आहेतच. आयटी कायद्यानुसार आरोपींविरुद्ध कारवाई होऊ शकते; परंतु आणखी कडक कायदे व नियम असायला हवेत.

-निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर

..........................................................................................

साेशल मीडियाचा अनधिकृत बाेभाटा

साेशल मीडियाच्या नावाखाली बेभान व बिनबुडाचा आधारहीन घटनांचा प्रसार वाढत चालला आहे. यावर शासनाचे नियंत्रण नाही आणि नियमनही नाही. यू-ट्यूबची कुबडी घेऊन पत्रकारिता मिरविणारे गल्लोगल्ली आपले अनधिकृत जाळे पसरवून जनसामान्यांना माेहजाळात ओढत आहेत, हे लाेकशाहीप्रणालीत धाेकादायक आहे. मध्यंतरी केंद्रीय माहिती प्रसारण विभागाने यू-ट्यूब न्यूज पाेर्टलची खातरजमा करावयास सुरुवात केली. त्याचे पुढे काय झाले, हे माहीत नाही.

-रामचंद्र देठे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद

....................................................................................................................

बेछूट सोशल मीडियावर निर्बंध हवेतच

सध्या सोशल मीडिया बेछूटच आहे. त्यावर निर्बंध हवेतच. यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची गरज आहे. मोबाइल कंपन्यांवरही कुणाचे नियंत्रण दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली चिंता खरी असून, त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.

-चंद्रकांत ठोंबरे, विधिज्ञ, औरंगाबाद खंडपीठ

.........................................................................

Web Title: (There will be a discussion ...) Are there strict restrictions on social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.