(चर्चा तर होणारच...) ईडीचा वापर राजकीय सुडापोटी होतोय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:02 AM2021-09-03T04:02:36+5:302021-09-03T04:02:36+5:30
- सुभाष झांबड, माजी आमदार, काँग्रेस .......................................................................................... चूक नसेल, तर घाबरता कशाला इडीचा वापर राजकीय सुडापोटी होण्याचा प्रश्नच नाही. ...
- सुभाष झांबड, माजी आमदार, काँग्रेस
..........................................................................................
चूक नसेल, तर घाबरता कशाला
इडीचा वापर राजकीय सुडापोटी होण्याचा प्रश्नच नाही. चूक नसेल तर घाबरता कशाला. वर्षानुवर्षे ज्यांच्या कधी चौकशाही झाल्या नव्हत्या, ज्यांच्यावर कधी कुणाचं नियंत्रणच नव्हतं, त्यांना इडीचा त्रास होतोय आणि ही अशी सारी मंडळी याला राजकीय स्वरूप देऊन आपला बचाव करीत आहेत.
- संजय केणेकर, शहराध्यक्ष, भाजप
................................................................................................
या आधीही ईडी होतीच
ईडीचा वापर राजकीय सुडेपोटीच होतो, यात शंकाच नाही. कारण, याआधीही ईडी होतीच ना. या पाचसहा वर्षांतच ईडीचा जाणीवपूर्वक वापर वाढवला गेला आहे. इतरही तपासणी यंत्रणा आहेतच. पण, त्या न वापरता जे आपल्या विरोधात जातील त्यांच्यावरच ईडीची कारवाई सुरू आहे. यातून संबंधितांची राजकीय हरॅसमेंट केली जात आहे. पण, प्रश्न हा आहे की, या राजकारणातून निष्पन्न काय होत आहे. काहीच नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
..............................................................................