चर्चा तर होणारच......नाट्यगृहे कधी उघडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:06 AM2021-09-02T04:06:32+5:302021-09-02T04:06:32+5:30
- जयंत शेवतेकर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ .............................................................................................. कलाकारांमुळेच कोरोना वाढतोय का? कलाकारांमुळेच कोरोना वाढतोय ...
- जयंत शेवतेकर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
..............................................................................................
कलाकारांमुळेच कोरोना वाढतोय का?
कलाकारांमुळेच कोरोना वाढतोय का? इतरांमुळे वाढत नाही का? असा प्रश्न पडावा आणि त्याचा संताप यावा, अशी सध्याची परिस्थिती आहे. नाट्यगृहे बंद असल्यामुळे ज्यांचे पोट कलेवरच अवलंबून आहे, त्यांच्यावर अक्षरश: उपासमारी ओढवली आहे. अनेक कलावंतांवर पडेल ते काम करण्याची वेळ आलेली आहे. औरंगाबादेत लग्नसमारंभात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्याची एक मोठी प्रथा आहे. कोरोनामुळे ती पुरती निकालात निघाली. आठवडाबाजारातील गर्दी, नाट्यगृहांमध्ये अलीकडे पार पडलेले राजकीय पक्षांचे कार्यक्रम पाहिल्यानंतर, राजकीय पक्षांचे मोर्चे व आंदोलने पाहिल्यानंतर कोरोना काय कलाकारांमुळेच होतो काय? असा प्रश्न पडतोय. अंतरे राखून कार्यक्रमांना परवानगी देता येऊ शकते ना? सरकार कलावंतांवर अन्याय करते, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे.
- शीतल रुद्रवार, ज्येष्ठ रंगकर्मी, औरंगाबाद