जिल्ह्यात होणार बहुरंगी लढती
By Admin | Published: September 26, 2014 12:22 AM2014-09-26T00:22:47+5:302014-09-26T01:55:41+5:30
औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घटस्थापनेच्या दिवशीच घटस्फोट झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घटस्थापनेच्या दिवशीच घटस्फोट झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे, अशी लढत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत होत आहे.
नऊ तालुक्यांतून उमेदवार उभे करण्यासाठी सर्व पक्षांनी तातडीने सर्व याद्या हाताशी घेऊन उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. सेना-भाजपाची मैत्री तुटण्यापूर्वी सेनेकडे ६, तर भाजपाकडे ३ मतदारसंघ होते. राष्ट्रवादीकडे ३ तर काँग्रेसकडे ६ मतदारसंघ होते. आता या सर्व पक्षांना ९-९ उमेदवार रिंगणात उतरवून भाग्य अजमावे लागणार आहे. या प्रमुख पक्षांशिवाय मनसे, महाराष्ट्र लोकशाही आघाडी, बसपा व एमआयएमही काही मतदारसंघांतून उमेदवार उतरविणार आहे.