भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा निघणार
By Admin | Published: September 12, 2016 11:14 PM2016-09-12T23:14:34+5:302016-09-12T23:23:10+5:30
औरंगाबाद : येत्या ३ आॅक्टोबर रोजी तपोवन, औरंगाबाद रोड, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी नुकतीच औरंगाबादेत बैठक झाली.
औरंगाबाद : येत्या ३ आॅक्टोबर रोजी तपोवन, औरंगाबाद रोड, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी नुकतीच औरंगाबादेत बैठक झाली. नाशिकच्या या मोर्चात मोठ्या संख्येने औरंगाबादहून सहभाग नोंदवावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
यासंदर्भात बोलताना बैठकीचे संयोजक मनोज घोडके यांनी सांगितले की, न्यायालयीन लढा चालू असताना व आरोप सिद्ध झालेले नसताना शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सूडबुद्धीने राजकीय खच्चीकरण करणे, बदनामी करणे व जास्तीत जास्त मानसिक त्रास देऊन जामीन होणार नाही, याची पुरेपूर व्यवस्था सरकार करीत असल्याचे दिसून येते.
ओबीसींचे नेतृत्वच शिल्लक राहणार नाही यासाठी हे सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु ओबीसी समाज हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा घोडके यांनी दिला आहे.
घोडके म्हणतात, छगन भुजबळ हे देशपातळीवरील ओबीसींचे नेतृत्व असून, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे भरीव योगदान आहे. अमोघ वक्तृत्व शैली, धडाडी, काम करण्याची त्यांची पद्धत अनोखी आहे. २००० च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी स्टार प्रचारक म्हणून अनेक सभा गाजवल्या. असे हे नेतृत्व संपवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप घोडके यांनी के ला आहे.
मोर्चात ज्यांना सहभागी व्हावयाचे आहे, त्यांना भरत कानडे, मकरंद सोनवणे, अतुल निकम यांच्याशी संपर्क साधता येईल, असेही कळविण्यत आले आहे.