शहरात दोन ठिकाणी होणार चक्काजाम
By Admin | Published: January 29, 2017 11:44 PM2017-01-29T23:44:39+5:302017-01-29T23:46:44+5:30
उस्मानाबाद :सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद : मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयासमोर व आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे़
रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ मूक मोर्चाप्रमाणेच हे आंदोलनही शांततेत यशस्वी करण्यात येणार आहे. घोषणाबाजी न करणे, खासगी वाहनांची तोडफोड न करणे, अरेरावीची भाषा न वापरणे, पोलिसांना सहकार्य करणे, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांसह इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना त्वरित मार्ग मोकळा करून देणे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़ या चक्काजाम आंदोलनात शहरासह परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले़ बैठकीस बंडू भोसले, ए़डीक़ाळे, पीक़े़मुंडे, विजय पवार, विक्रम पाटील, रोहित बागल, आबा हंगरगेकर, विष्णू इंगळे, रणजित रणदिवे आदींनी केले आहे.