शहरात लवकरच ‘फोर-जी’ येणार
By Admin | Published: October 17, 2014 11:48 PM2014-10-17T23:48:55+5:302014-10-17T23:57:09+5:30
औरंगाबाद : शहर लवकरच ‘थ्री-जी’च्या पुढील ‘फोर-जी’च्या रेंजमध्ये येणार आहे.
औरंगाबाद : शहर लवकरच ‘थ्री-जी’च्या पुढील ‘फोर-जी’च्या रेंजमध्ये येणार आहे. इंटरनेटच्या सेवेतील ही अत्याधुनिक क्रांती औरंगाबादकरांना अनुभवायला मिळणार आहे. ३० आॅक्टोबर रोजी प्राथमिक स्वरूपात या सेवेचे उद्घाटन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सूतगिरणी परिसरात फोर-जी टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १० कि़मी.च्या रेंजमध्ये ही सेवा सुरुवातीला देण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये औरंगाबादचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि औरंगाबाद या शहरांत एकाच दिवशी ‘फोर-जी’च्या सेवेस प्रारंभ होणार आहे.
सध्या शहरात १२५ टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. नेटवर्क उभारण्यासाठी रिलायन्स जिवा इन्फोकॉम लि.चे कंत्राटदार काम करीत आहेत. शहरातील अंतर्गत असलेले सुमारे २५० कि़मी. रस्त्यांच्या बाजूला केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने पालिकेला ३६ कोटी रुपये दिले आहेत, तर १२५ ठिकाणची जागाही टॉवर उभारणीसाठी देण्यात आली आहे.