ते लपून दुकाने उघडत, यांनीही लपूनच कारवाई केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:03 AM2021-05-25T04:03:26+5:302021-05-25T04:03:26+5:30
सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र चोरुन लपून काही दुकानदार दुकाने उघडून व्यवसाय करीत ...
सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र चोरुन लपून काही दुकानदार दुकाने उघडून व्यवसाय करीत असल्याचे समोर येत आहे. सिल्लोड शहरात पोलिसांचे वाहन आले की दुकान बंद करणे, वाहन गेले की, पुन्हा सुरु करणे असे प्रकार काही दुकानदार करीत होते. यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न वाया जाऊन कोरोना प्रसारही होत होता. याला अटकाव घालण्यासाठी सिल्लोड पोलिसांनी चंग बांधला. रविवारी व सोमवारी पोनि. राजेंद्र बोकडे, पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत, गहिनीनाथ गीते, कृष्णा खाडे, सत्यवान जांभळे, पंडित फुले, तुकाराम टारपे यांनी साध्या गणवेशात दुचाकीवर व पायी पेट्रोलिंग करून शहरात लपून पाळत ठेवली. यात असे चोरुन व्यवसाय करणारे शेख आजीम शेख आयुब, राहुल प्रकाश पंडित, विलास पारसमल ओस्तवाल, अकील अहेमद शेख बाबा, शेख सुलतान शेख रशीद, मुकेश चंद्रभान तलरेजा, अल्ताफखान पठाण, आमेरखान पठाण, मनोज पोफळे, दिगंबर पोफळे, कदिर मन्सुरी हे ११ दुकानदार सापडले. पोलिसांनी या सर्वांवर नियमांचे पालन न करणे, विनापरवानगी दुकान उघडे ठेवणे कलम १८८,२६९, २७० भादंवि प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
फोटो कॅप्शन : सिल्लोड शहरात गस्त घालताना पोनि. राजेंद्र बोकडे, पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत, गहिनीनाथ गीते, कृष्णा खाडे, सत्यवान जांभळे, पंडित फुले, तुकाराम टारपे दिसत आहे.