चोरीचा गुटखा घेणाऱ्या चौघांना लुटले

By Admin | Published: May 20, 2017 12:43 AM2017-05-20T00:43:38+5:302017-05-20T00:46:51+5:30

शिराढोण : कमी पैशात गुटख्याची खरेदी करण्यास गेलेल्या चौघांकडील पावणेपाच लाखाची लूट सहा इसमांनी केली़

They robbed all those who took the gutka | चोरीचा गुटखा घेणाऱ्या चौघांना लुटले

चोरीचा गुटखा घेणाऱ्या चौघांना लुटले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिराढोण : कमी पैशात गुटख्याची खरेदी करण्यास गेलेल्या चौघांकडील पावणेपाच लाखाची लूट सहा इसमांनी केली़ ही घटना १८ मे रोजी सायंकाळी नागझरवाडी- तडवळा मार्गावर घडली़ दरम्यान, घटनेनंतर चौघांनी दरोडा पडल्याचा बनव करीत पोलिसांना जिल्ह्यात नाकाबंदी करायला भाग पाडले़ या प्रकरणातील सत्य पोलिसांसमोर आल्यानंतर वरील चौघांसह सहा जणांविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागझरवाडी-तडवळा रोडवर यातील आरोपींनी कमी पैशात गुटखा देतो म्हणून बोलावून घेतले होते़ गुटखा खरेदी करण्यासाठी महारुद्र काळे, सचिन डोके, विराज बागडे, रोहित काळे हे गेले़ त्यावेळी तेथे असलेल्या सहा जणांनी चौघांकडील ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम व मोबाईल लंपास घेऊन पळ काढला़ कमी पैशात गुटखा खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर जवळपास पावणेपाच लाखाची लूट झाल्यानंतर त्या चौघांनी पोलिसांना सत्य परिस्थिती न सांगता दरोडा टाकल्याचा बनाव करीत माहिती दिली़ पोलिसांना घटनास्थळावरील वाहन (क्र.एम.एच.१२ एफ.सी. ५५६९) व कार (क्र.एम.एच.०४ ई एफ ४३६६) व जीप क्र. (एम.एच.२५ आर १०५७) या वाहनांचे क्रमांक सांगितले़ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून जिल्ह्यात नाकाबंदी केली़ मात्र, पोलिसांच्या तपासात चौघांची लूट झाली असून, ते कमी पैशात गुटखा खरेदीस गेल्याचे समोर आले़ याप्रकरणी पोलीस नाईक विजय ज्ञानदेव गणापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी महारुद्र काळे (रा. घोडका राजुरी ता. बीड), सचिन डोके (रा. पारगाव), विजय बागडे (रा. भूम), रोहित काळे (रा. चौसाळा, ता.बीड) या चौघांसह भुऱ्या शिंदे, पापा शिंदे (रा. बोरखेड लोणी), धनाजी शिंदे (रा. मोहा), सचिन काळे (रा. कळंब), झिंग्या काळे (रा. नागझरवाडी), हिरा काळे (रा. मोहा) यांच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संजीवन मिरकले हे करीत आहेत.

Web Title: They robbed all those who took the gutka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.