वाळूजला चोरट्याने गाय-वासरू लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:02+5:302021-06-22T04:05:02+5:30

वाळूज महानगर : घरासमोरून ४० हजार रुपये किमतीची गाय व वासरू लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

The thief snatched the cow-calf from the sand | वाळूजला चोरट्याने गाय-वासरू लांबविले

वाळूजला चोरट्याने गाय-वासरू लांबविले

googlenewsNext

वाळूज महानगर : घरासमोरून ४० हजार रुपये किमतीची गाय व वासरू लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण विष्णू माने (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) यांनी रविवारी (दि.२०) सायंकाळी जर्सी गाय व तिचे दोन महिन्यांचे वासरू वाड्यात बांधले होते. रात्रीच्या सुमारास कुणीतरी चोरट्याने संधी साधून गाय व वासरू चोरून नेले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडीस आल्यानंतर किरण माने यांनी वाळूज पोलीस ठाणे गाठून गाय व वासरू चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.

------------------------------

तरुणाला मारहाण; दोघांविरुध्द गुन्हा

वाळूज महानगर : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून जोगेश्वरी रोडवर एकास मारहाण करणाऱ्या दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शेषराव ठोकळ (३८ रा. रांजणगाव) हे शनिवार (दि.१९) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास मित्र नकुल वैद्य याच्या सोबत जोगेश्वरी रोडवर गप्पा मारत उभे होते. यावेळी गणेश ठोकळ यांचा साडू सोमनाथ चव्हाण व मेव्हणा किरण डोंगरे यांनी तू पंधरा दिवसांपूर्वी आमच्या विरोधात पोलूस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून वाद घातला. दरम्यान, गणेश ठोकळ हे दोघांना समजावून सांगत असताना सोमनाथ चव्हाण याने लोखंडी रॉडने ठोकळ यांच्या डाव्या कानावर व पायावर मारून जखमी केले. तर कृष्णा डोंगरे याने ठोकळ यांना मारहाण केली. यावेळी नकुल वैद्य यांनी भांडण सोडवून गणेश ठोकळ यांना जखमी आवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मारहाण प्रकरणी सोमनाथ चव्हाण व कृष्णा डोंगरे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------------------

Web Title: The thief snatched the cow-calf from the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.